*शाळेची माजी विध्यार्थीनी झाली शाळेची मुख्याध्यापिका* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, November 29, 2023

*शाळेची माजी विध्यार्थीनी झाली शाळेची मुख्याध्यापिका*

*शाळेची माजी विध्यार्थीनी झाली शाळेची मुख्याध्यापिका*                  
बारामती;-बारामतीच्या म.ए.सो. विद्यालयाच्या मुख्याद्यापिका पदी सौ.रोहीणी अविनाश गायकवाड यांची नियुक्ती  बारामतीः येथील म.ए.सो.चे कै.ग.भि.देशपांडे विद्यालयाच्या मुख्याद्यापिका म्हणून सौ.रोहीणी अविनाश गायकवाड यांनी दि. २८नोव्हेंबर २०२३ रोजी पदभार स्विकारला. सौ.रोहीणी गायकवाड या याच शाळेच्या माजी विद्यार्थीनी आहेत. सन १९८६ साली त्यांनी सहाय्यक शिक्षक म्हणून आपल्या कार्याची सुरुवात केली. व आपल्या कारकिर्दी मध्ये त्यांना पुणे जिल्हा आदर्श शिक्षीका पुरस्कार तसेच अनेक सामाजिक व शैक्षणिक पुरस्कार मिळाले आहेत. सन २०२१रोजी मुख्याध्यापिका पदी पदोन्नती होऊन त्यांची नियुक्ती म.ए.सो.ज्ञानमंदीर विद्यालय कळंबोली, पनवेल नवीमुंबई येथे झाली होती व तेथे कार्यरत असताना नुकतीच त्यांची बारामती येथे बदली होऊन शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणा-या म.ए.सो.विद्यालय मुख्याध्यापिका म्हणून नियुक्ती झाली आहे.सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment