तलाठी, मंडलअधिकारी यांना कारवाईसाठी नाही वेळ.! माती उत्खननात लागत नाही नियमाचा मेळ.!!
बारामती:-बारामती तालुक्यातील नदीकाठच्या अनेक गावात व शेतात अवैध माती उत्खनन केले जात असल्याची तक्रारी वाढत असताना त्या हद्दीत येत असलेल्या तलाठी व मंडलअधिकारी कार्यालयात गेल्यावर काय वागणूक मिळते हे स्थानिक भागातील नागरिकांना विचारा म्हणजे उत्तरे काय येतील हे कळेल, वारंवार अवैध उत्खनन च्या विरोधात तहसील कार्यालयात महसूल विभागाला तक्रारी केल्या असल्या तरी त्याची दखल घेतली जात नसल्याचे अनेकांनी बोलून दाखविले काही ठिकाणी माती उत्खनन रॉयल्टी भरून केली जात असली तरी त्याबाबत असलेले नियम मात्र मोडलेले दिसत आहे,कमी रॉयल्टी भरून ज्यादा उत्खनन करायचे व रॉयल्टी भरली असे भासवायचे तसेच माती ट्रक अथवा ट्रॅक्टर मधून वाहून नेत असताना त्यावर झाकलेले नसते, तर उघडी असते त्यामुळे त्याची धूळ रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना,विद्यार्थ्यांना डोळ्यात जात असल्याने सहन करावा लागत असून रस्त्याची वाट लागलेली असते,रस्यात सांडलेल्या मातीमुळे गाड्या घसरून पडून अपघात होत आहे, याविषयी स्थानिक रहिवासी यांनी तक्रार करूनही तलाठी व मंडल अधिकारी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचे सांगण्यात येत आहे, बारामती तालुक्यातील अनेक गावात हा प्रकार पहावयास मिळत असताना नुकताच निरावागज गावात माती मुळे त्रास होत असल्याचे तक्रार स्थानिक रहिवाशी यांनी लेखी तक्रार केल्याचे सांगण्यात आले असून याबाबत दखल न घेतल्यास वरिष्ठ पातळीवर जाऊन तक्रार अर्ज करून संबंधितावर कारवाई करायला भाग पाडणार असल्याचे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment