101 निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान ! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, December 11, 2023

101 निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान !

101 निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान !
 इंदापूर (प्रतिनिधी):- ‘आपले जीवन परोपकारासाठी वेचल्यानेच त्याचे मोल वाढते’ या निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या शिकवणूकीला अनुसरुन अंथूर्णे येथे 101 निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले. प्रामुख्याने यामध्ये महिलांचाही सहभाग होता.
     संत निरंकारी मिशन चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने अंथूर्णे (ता. इंदापूर) शाखेच्या सत्संग भवनात, रविवारी (ता. 10) रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
     या शिबिराचे उद्घाटन संत निरंकारी मिशन सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी येथील आजुबाजुच्या शाखांचे मुखी तसेच सेवादल अधिकारी उपस्थित होते.
  याठिकाणी 11 ते 1 या वेळेत श्री. झांबरे यांच्या उपस्थितीत विशेष सत्संग सोहळा आयोजित केला होता त्यावेळी मार्गदर्शन करताना श्री. झांबरे म्हणाले रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे सांगितले. तसेच संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, मोफत आरोग्य तपासणी, नेत्र चिकित्सा शिबीर, तसेच महिला सशक्तीकरण, बाल विकास, नैसर्गिक संकटाच्या वेळी सहायता यासारख्या कल्याणकारी अशा विविध प्रकारे उपक्रम राबवित असल्याचे सांगितले.. 
    या शिबिरामध्ये इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित स्व. माणिकबाई  चांदूलाल सराफ बारामती या रक्तपेढीने रक्त संकलन केले.
   बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशोर माने यांच्या सहकार्याने व अंथूर्णे शाखेचे प्रमुख महादेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
    शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सेवादल अधिकारी, सेवादल, सेवादल भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment