महाराष्ट्राचा 57वा निरंकारी संत समागम नागपूरमध्ये..
बारामती - (प्रतिनिधी) निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या पावन छत्रछायेमध्ये महाराष्ट्राच्या 57व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन दि. 26, 27 व 28 जानेवारी, 2024 दरम्यान सुमठाणा, नागपूर येथील विशाल मैदानांवर आयोजित होणार आहे.
मानवी जीवन अंतर्मनातील शांतीसुखाने परिपूर्ण करत विश्वामध्ये शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्याचा कल्याणकारी संदेश जनमानसापर्यंत पोहचविणे हाच या संत समागमाचा उद्देश आहे.
या भव्य आध्यात्मिक आयोजनाची पूर्वतयारी करण्यासाठी ‘स्वेच्छा सेवांचे’ विधिवत उद्घाटन परम आदरणीय श्री.मोहन छाबड़ा, मेंबर इंचार्ज, प्रचार प्रसार, संत निरंकारी मंडळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या उदघाटनास सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे, बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशोर माने तसेच बारामतीसह परिसरातून मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती.
स्वेच्छा सेवांच्या उद्घाटन प्रसंगी पूज्य श्री मोहन छाबड़ा जी यांनी आपले भाव व्यक्त करताना म्हटले, की सद्गुरुच्या असीम कृपेने यावर्षी नागपूर नगरीत महाराष्ट्राचा 57वा वार्षिक निरंकारी संत समागम आयोजित होत असून केवळ नागपूरमधीलच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील भविक भक्तगणांसाठी हा सेवेची ही एक अमूल्य संधी प्राप्त झालेली आहे.
हा दिव्य संत समागम सर्वार्थाने यशस्वी व्हावा यासाठी निरंकारी सेवादलाचे स्वयंसेवक आणि मोठ्या संख्येने अन्य निरंकारी भक्तगण मोठया तन्मयतेने पूर्वतयारीमध्ये जुटलेले लागले आहेत.
No comments:
Post a Comment