सलग दहाव्या वर्षी विक्रमी संख्येने रक्तदान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करणार - उमेश चव्हाण* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 5, 2023

सलग दहाव्या वर्षी विक्रमी संख्येने रक्तदान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करणार - उमेश चव्हाण*

*सलग दहाव्या वर्षी विक्रमी संख्येने रक्तदान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करणार - उमेश चव्हाण*
 पुणे :- रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीच्या वतीने विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाभव्य रक्तदान शिबिराचे आयोजन पुणे स्टेशन येथील आंबेडकर पुतळा येथे करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी महा भव्य रक्तदान शिबिराचे दहावे वर्ष आहे. पुणे शहरात रक्ताचा असणारा तुटवडा भरून काढण्यासाठी या रक्तदान शिबिरात सहभागी होणारे भीमसैनिक माणुसकी प्रति करूया रक्तदान! म्हणत सर्व जाती-धर्माच्या रुग्णांचे प्राण वाचवतात. या ठिकाणी विक्रमी संख्येने रक्तदान करण्यासाठी उपस्थित  राहतात. यंदाही बहुसंख्येने रक्तदानातून अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने भीमसैनिक येतील असा विश्वास रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी व्यक्त केला . 
        रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने सातत्याने गेली दहा वर्ष अखंड 24 तास आंबेडकरी विचारांचा जागर करीत समतेचा विचार पेरण्याचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जात आहेत. यंदाही पुणे जिल्हा कला विकास संघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ) आणि गझल गायक अशोक गायकवाड यांच्या आंबेडकरी गझल आणि शाहिरी गीतांचा कार्यक्रम बुधवार दिनांक 6 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.00 ते रात्रौ 10.00 वाजेपर्यंत पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रम होणार आहेत.
         महापरिनिर्वाण दिनी श्रद्धांजलीपर आंबेडकरी गीते, चर्चासत्र, परिसंवाद, कवी संमेलन, बुद्ध वंदना, व्याख्याने आणि रक्तदान कार्यक्रमाद्वारे महापरिनिर्वाण दिन साजरा करणार आहोत. भीमसैनिकांचे  शारीरिक आरोग्य आणि वैचारिक आरोग्य अधिक सुदृढ आणि समृद्ध करण्यासाठी अखंड 24 तास आंबेडकर विचारांचा जागर समाजाला दिशा देणारा कार्यक्रम ठरत आहे, असेही मुख्य संयोजक तथा रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले. पुणेकरांना बहुसंख्येने रक्तदान करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.


No comments:

Post a Comment