संयुक्त भारत पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता पदी : विकास कुलकर्णी - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, December 8, 2023

संयुक्त भारत पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता पदी : विकास कुलकर्णी

संयुक्त भारत पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता पदी : विकास कुलकर्णी
---------------------------------------------
मुंबई प्रतिनिधी : सध्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता कोणत्याही राजकीय पक्षावर जनतेचा विश्वास राहिला नाही. पेट्रोल, डिझेल, ग्यास सिलेंडर, खाद्य तेल यासह जीवनावश्यक वस्तूंचे गगणाला भिडलेले भाव, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळत नसल्याने उद्धवस्त झालेला शेतकरी वर्ग,
महाराष्ट्र शासनाने 1400 शाळा बंद केल्या व सहा हजार हुन जास्त शाळाचे खाजगीकरण केल्यामुळे भरकटलेला उध्वस्त झालेला विद्यार्थी वर्ग सुशिक्षित बेरोजगार, आरोग्य व्यवस्थितील सावळा गोंधळ त्यातच संपूर्ण महाराष्ट्रात सर्व धर्मीय आरक्षनाचा लढा, आंदोलने, जाळपोळ, यामुळे संपूर्ण महाराष्ट्र उध्वस्त झाला आहे. याला विश्वासघाती राजकीय नेते जबाबदार आहेत.
आता महाराष्ट्रातील जनतेला नवीन पर्याय हवा आहे.
म्हणून नवा पक्ष! नवीन विचार! घेऊन महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संयुक्त भारत पक्ष उदयास आला असून सध्या महाराष्ट्रासह राजस्थान, नगर हवेली, या राज्यात काम चालू आहे. महाराष्ट्रातील तळागाळातील सुशिक्षित तरुण कार्यकर्ते मोठया प्रमाणात पक्षात सामील होत आहेत.
संयुक्त भारत पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता पदी : पत्रकार विकास कुलकर्णी यांची संयुक्त भारत पक्षाचे राष्ट्रीय महासचिव मा. संभाजीराव जाधव यांनी विकास कुलकर्णी यांना नियुक्ती पत्र प्रदान केले.
विकास कुलकर्णी राहणार मिरज, जिल्हा सांगली. येथे गेली सदतीस वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत आहेत,ते 13 वर्ष दै. केसरी मध्ये नोकरीला होते नोकरी करत असतानाच अनेक वृत्तपत्राचे वृत्त संकलन केले त्यामध्ये दै. जनप्रवास, तरुण भारत, पुण्यनगरी, रत्नागिरी टाइम्स अशा राज्यस्तरीय वृत्तपत्रात बातमीदार म्हणून दहा वर्षे काम केले,
कल्चर मोमेन्ट मिरज या सास्कृतिक संघटनेतून 1980 पासून व आधी महाविद्यालयातून तीन अंकी नाटक, एकांकी का व गायन कला यामध्ये गेली 43 वर्षे काम करत आहेत, आजपर्यंत 20 एकांकीका मध्ये काम केले आहे. त्यांना अनेक बक्षीस मिळाली आहेत. पूरग्रस्त व भूकंपग्रस्त यांना मदत करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
राजकीय क्षेत्राचा भरपूर अनुभव तसेच अध्यात्मिक, वैदिक, व ऐतिहासिक जवळ जवळ दोनशे पुस्तकांचे वाचन केले आहे.
कातळ नावाचा कथासंग्रह प्रसिद्ध आहे.
भाषण कला अवगत असल्यामुळे सामाजिक आणि राजकीय पातळीवर काम करत असताना अनेक सभा गाजवल्या आहेत.विकास कुलकर्णी यांनी 1978 पासून  भारतीय जनता पक्षात  सुरवात केली जवळ जवळ 32 वर्षे  राजकीय क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असल्यामुळे संयुक्त भारत पक्षाची भूमिका सर्वत्र योग्यरित्या मांडून पक्ष संघटनेला निश्चितच  विकास कुलकर्णी यांचा फायदा होईल. येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, नगर पालिका, महानगर पालिका निवडणुकीत संयुक्त भारत पक्षाचे उमेदवार महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात निवडणूक लढवणार असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  मा. अशोकजी बहादरे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष  मा. ओंकार  अय्यर तसेच पक्षातील सर्व कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून नवनिर्वाचित प्रदेश प्रवक्ते : विकास कुलकर्णी यांना भावी राजकीय कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा!

No comments:

Post a Comment