कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक न होण्याबाबत दक्षता घेण्याचे तक्रार समिती जिल्हा अधिकारी वनश्री लाभशेटवार यांचे आवाहन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, December 18, 2023

कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक न होण्याबाबत दक्षता घेण्याचे तक्रार समिती जिल्हा अधिकारी वनश्री लाभशेटवार यांचे आवाहन..

कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक न होण्याबाबत दक्षता घेण्याचे तक्रार समिती जिल्हा अधिकारी वनश्री लाभशेटवार यांचे आवाहन..
पुणे:- जिल्ह्यातील दहा किंवा दहापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असणाऱ्या सर्व कार्यालयात नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांची कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणूक होणार नाही आणि त्यांच्या कायदेशीर हक्कांचे संरक्षण होईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन स्थानिक तक्रार समितीच्या जिल्हा अधिकारी वनश्री लाभशेटवार यांनी केले आहे.

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) कायद्यातील तरतुदीनुसार नोकरी , व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळवणुकीबाबतच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी आणि छळ करणाऱ्या व्यक्तीस शिक्षा करण्यासाठी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. शासकीय कार्यालय, स्थानिक प्राधिकरणाची कार्यालये, खाजगी कार्यालय, संस्था, संघटना, मंडळ, कंपनी, कारखाना, रुग्णालये, शाळा, महाविद्यालय, हॉटेल, दुकाने, बँक आदींमध्ये दहा किंवा दहापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असलेल्या सर्व कार्यालयाच्या प्रमुख, ठिकाणांचे मालकांनी आवश्यक कार्यवाही करावी.

 कार्यालय, कामाच्या ठिकाणी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करावी. समिती स्थापन केल्याबाबतचे माहितीचे फलक कार्यालयाच्या दर्शनी ठिकाणी लावावे. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) कायदा, २०१३ चे नियम आणि कायद्याची हस्तपुस्तिका www.wcd.nic.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  कार्यालयाअंतर्गत तक्रार समितीकरीता कार्यालयातील महिला कर्मचारी, महिला गटाकरीता कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण)  कायदा, २०१३ च्या कायद्याविषयी कार्यशाळा तसेच विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करावे. प्रशिक्षणविषयक माहिती राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या nalsa.gov.in/training-modules या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पुणे, पत्ता २९/२, गुलमर्ग पार्क कोऑपरेटिव्ह हौसींग सोसायटी, तिसरा मजला, जाधव बेकर्स जवळ, सोमवार पेठ, पुणे - ४११०११, ईमेल-cpune2021@gmail.com यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment