अंगणवाडी कर्मचारी संघटनांचा दि.११ डिसेंबर रोजी बारामतीत मोर्चा..
बारामती:- दि.४ डिसेंबर २०२३ पासून बेमुदत संप चालू असून यावेळी दि.११/१२/२०२३ रोजी बारामतीतुन मोर्चा काढणार असल्याचे अंगणवाडी कर्मचारी संघटना पुणे जिल्हा अध्यक्षा आशाबी शेख, व बारामती तालुका अध्यक्षा मंगल कोकरे यांनी बोलताना सांगितले, एकात्मिक बालविकास ही योजना गेली ४८ वर्षे कार्यरत असून या योजने मध्ये विधवा, परितक्ता,निराधार शेतमजूर महिला असून एवढयाशा तुटपुंज्या मानधनावर उदर निर्वाह करणे महागाईच्या काळात कठीण झाले आहे.तरी शासनास अशी विनंती सेविकांना राहील की २६००० हजार व मदतनिस यांना २०००० रुपये मानधन दयावे, तसेच पेन्शन योजना लागू करावी व गेच्युरिटी मिळावी हया महत्वाच्या 3 मागण्या घेऊन आम्ही
४ तारखेपासून बेमुदत संप पुकारला असून
जोपर्यत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा इशारा महाराष्ट्र राज्य कृती समितीने निर्धार केला आहे.
तरी आपणास आमच्या व्यथा शासन दरबारी पोहचावे अशी मागणीसाठी दि.११/१२/२०२३ रोजी बारामतीतुन मोर्चा काढणार असल्याचे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment