काय सांगता..चक्क दारूड्या बायकोच्या त्रासाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या..
पुणे :-महिला अत्याचार होतात पण येथे तर पुरुष अत्याचार होतोय असे मिळालेल्या माहितीनुसार दिसत आहे, व्यसन करण्यासाठी नवरा बायकोकडे पैशांची वारंवार मागणी करतो आणि पैसे न दिल्यास बायकोला मारहाण किंवा नवऱ्याच्या छळाला कंटाळून बायकोने आत्महत्या केल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या आहेत. मात्र पुण्यात चक्क बायकोच्या मागणीला कंटाळून नवऱ्याने आत्महत्या केल्याची घटना
घडली आहे. पुणे जिल्ह्यातील देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पोलिसांनी बायको आणि तिच्या बहिणीला अटक केली आहे.समोर आलेल्या माहितीनुसार,बायको दारू पिण्यासाठी नवऱ्याकडे वारंवार पैशांची मागणी करत असे. त्यावरून पती आणि तिच्या बहिणीने छळ केला. त्याला कंटाळून पतीने
आत्महत्या केली आहे. नारायण मधुकर निर्वळ (वय 35),असे आत्महत्या केलेल्याचे पतीचे नाव आहे. ज्ञानेश्वर मधुकर निर्वळ (39, रा. सोमठाणा, ता. मानवत, जि.परभणी) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी नारायण निर्वळ यांची पत्नी आणि तिची बहीण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून
दोघींना अटक केली, नारायण निर्वळ हे अॅनिमेशन क्षेत्रात कार्यरत होते. त्यांच्या पत्नीला देखील काही दिवसांपूर्वी 'वर्क फ्रॉम
होम' मिळाले होते. दरम्यान, नारायण यांची पत्नी आणि तिची बहीण यांनी नारायण यांच्याकडे दारू पिण्यास पैशांची मागणी केली. तसेच नारायण यांच्याशी वारंवार भांडणे करून मानसिक व शारीरिक त्रास दिला. याला
कंटाळून नारायण यांनी 17 जानेवारी रोजी राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली.पतीने केली होती मोठ्या भावाकडे पत्नीची तक्रार नारायण यांनी मानसिक व शारीरिक त्रास होत असल्याबाबत भाऊ ज्ञानेश्वर निर्वळ यांना फोनवरून मेसेज केले होते. त्यावरून ज्ञानेश्वर यांनी पोलिसांकडे तक्रार केली. नारायण यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लग्नानंतर दोघांमध्ये सर्वकाही सुरळीत सुरू असताना,मागील काही दिवसात व्यसनावरून नव्या वादाला सुरुवात
झाली. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये मागील काही दिवसांत वाद होत होते. दरम्यान, हाच वाद एवढ्या टोकाला गेला की, पतीने आत्महत्या केली आहे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे.
No comments:
Post a Comment