प्रजासत्ताक दिना निमित्त आभाळमाया ग्रुपचा मुलींसाठी काही उपक्रमाचे आयोजन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, January 26, 2024

प्रजासत्ताक दिना निमित्त आभाळमाया ग्रुपचा मुलींसाठी काही उपक्रमाचे आयोजन..

प्रजासत्ताक दिना निमित्त आभाळमाया ग्रुपचा मुलींसाठी काही उपक्रमाचे आयोजन..
बारामती:-'लेक वाचवा,लेक शिकवा' मुलगी शिकेल तर, घर सावरेल ही संकल्पना घेऊन २६ जानेवारी २०२४ रोजी *प्रजासत्ताक दिना* निमित्त आभाळमाया ग्रुप ने मुलीनं साठी काही उपक्रमाचे आयोजित कार्यक्रम घेतले. महिला हॉस्पिटल एमआयडीसी बारामती येथे २६ जानेवारीला जन्म घेतलेल्या मुलींना  सरकारी योजना  शिक्षण पॉलिसीचा पहिला हप्ता आभाळ माया ग्रुप तर्फे भरून शिक्षणासाठी सोळाव्या वर्षी तो पैसा डिग्री घेण्यास कामाला येईल या उद्देशाने कार्यक्रम घेण्यात आले. अजूनही छोट्या गावात काही कारणास्तव  मुलींचे शिक्षण थांबवले जात आहे. ते शिक्षण थांबू नये या उद्देशाने एक छोटासा पाऊल आभाळमाया ग्रुप यांनी घेतला. आज मुलगी शिकली प्रगती झाली हे ब्रीद वाक्य प्रत्येक महिलेने सिद्ध करून दाखवले आहे. त्या साठी सुद्धा आज सर्व महिला मिळून हा उपक्रम राबवत आहेत. आज या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून सरकारी महिला हॉस्पिटल बारामती येथील स्त्री रोग तज्ञ माननीय डॉक्टर  बापू भोई उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष अनिताताई गायकवाड यांचही मार्गदर्शन लाभले. आभाळमाया च्या अध्यक्षा सौ अल्पा ताई भंडारी तसेच त्यांचे सहकारी सायली मोदी, लता ओसवाल, सुनिता मोदी,  मेघना गुगळे, नम्रता मोदी, एडवोकेट श्रद्धा खळदकर यांनी कार्यक्रमाची पाहणी केली.

No comments:

Post a Comment