विविध मागण्यांसाठी बारामतीत शिवसेना, भाजप च्या पदाधिकाऱ्यांचे आमरण उपोषण.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, January 27, 2024

विविध मागण्यांसाठी बारामतीत शिवसेना, भाजप च्या पदाधिकाऱ्यांचे आमरण उपोषण..

विविध मागण्यांसाठी बारामतीत शिवसेना, भाजप च्या पदाधिकाऱ्यांचे आमरण उपोषण..
बारामती:- बारामती औद्योगिक क्षेत्रातील भुखंड हा विना निविदा काढता व कवडीमोल भावात
तत्कालीन मंत्र्यांच्या आशिर्वादाने व म.रा.औ.वि.मंडळाच्या मुख्य कार्यकारी अभियंता, वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई प्रादेशिक अधिकारी जोग सेंटर, पुणे यांच्या भ्रष्ट कारभारामुळे प्रदान करण्यात आला. सदर भुखंड हा दर्शनी भागातील असुन मराऔवि साठीच्या नियोजित कार्यालयासाठीठेवण्यात आलेला सदर भुखंड होता. परंतु ७००० चौ.मी. एवढा भुखंड
बिल्डरच्या घशात घालुन काही अधिकाऱ्यांनीसदर भुखंडाच्या जागेवर विकसित होणाऱ्या
मॉल व शॉपींग सेंटर मध्ये नातेवाईकांच्या नावे भागीदारी मिळवली आहे मात्र कवडीमोल
किमतीत भुखंड वाटप करून मंत्री व अधिकारी यांनी जाणीवपूर्वक सरकारचे आर्थिक नुकसान
केले आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बारामती येथील कर्मचारी व उपप्रादेशीक अधिकारी
(आरटीओ) यांचे हात एजंटच्या सहकार्याशिवाय प्रशासकीय काम देत नाहीत एजंटच्या
माध्यमातुन मोठया प्रमाणात वसुल्या केल्या जातात. अतिरिक्त व नियमबाहय बोजा
वाहणाऱ्या गाड्यांच्या गतीवर नियंत्रणराहत नाहीत अपघाताचे प्रमाण वाढत जाते काही
दिवसापुर्वी लोंढे दाम्पत्य हे बऱ्हाणपूर येथे ओव्हरलोड गाडीने चिरडले आणि या सर्व
अतिरिक्त भार असणाऱ्या गाड्यांकडुन ठराविक रक्कम एजंटच्या माध्यमातुन गोळा केली
जाते व फायनान्स कंपनीच्या गाडया वसुलीसाठी दादागिरी व दमदाटी करून रस्त्रूायवर
शिवीगाळ करणारे गावगुंड जनतेच्या वयाचा, स्त्री, मुली, महिला असणाऱ्या कोणताही मान
न ठेवता भर रस्त्यावरच अब्रुची लक्तरे काढत असतात व यावर आरटीओ बारामती हे अंध
डोळ्यांनी व भ्रष्ट माथ्याने आशिर्वाद देण्याचे काम करतात म्हणुन आरटीओची बदली होणे
गरजेचे आहे, इन्फ्रा कंपनीच्या अंतर्गत बारामती नगरपरिषद हद्दीत झालेल्या कामाच्या तीन टण्या
मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. भुतिगत विदयुत वाहिन्या टाकण्यामध्ये
वापरण्यात आलेले साहित्य अतिशय निकृष्ट दर्जाचे व काही ठिकाणी जुने साहित्य देखील
वापरण्यात आले आहे जमीन खोदाई करताना अंदाजपत्रकाप्रमाणे खोदाई झालेली नाही
अवाची सवा किंमती दाखवुन अंदाजपत्रके तयार करण्यात यआली तसेच बारामती झोन
अंतर्गत झालेल्या पालखी महामार्गावरील पोल स्थलांतरीत करतेवेळी तसेच मोरगांव ते निरा
नरसिंगपुर रोड व बारामती फलटण रोड व पीएमआरडीचे रोड पोल स्थलांतर या सर्व कामांची चौकशी करून संबंधीत दोषींवर कारवाई करण्यात यावी.बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर भागामध्ये मोठ्या प्रमाणात मटका, जुगार, ऑनलाईन मटका जुगार, अवैध दारू, गावठी दारू, ताडी, गांजा, वेश्याव्यवसाय, लॉजींगवर चालणारी देह विक्री ९ नशेचे पदार्थ स्टेरॉईड, टरमीन इ. सर्व बेकायदा धंदे सुरू आहेत ते सर्व बंद होवून पुढील पिढी व्यसनाधिन होणार नाही व सुशिक्षीत होईल.या सर्व मागण्यांसाठी दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजलेपासुन
प्रांत कार्यालय बारामती यांचे समोर बेमुदत आमरण उपोषणास बसलो आहे सदर आमरण
उपोषण हे संबंधीत प्रशासनाच्या विरोधात आहे.असे पत्र उपोषणकर्ते अॅड. आकाश प्रकाश दामोदरे- महाराष्ट्र प्रदेश सदस्य भाजप युवा मोर्चा,वस्ताद सचिन (पप्पू) माने
शिवसेना कार्याध्यक्ष पुणे जिल्हा यांनी दिले.

No comments:

Post a Comment