खळबळजनक..बारामतीत आढळलं धड नसलेले लहान बाळाचं मुंडकं.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 3, 2024

खळबळजनक..बारामतीत आढळलं धड नसलेले लहान बाळाचं मुंडकं.!

खळबळजनक..बारामतीत आढळलं धड नसलेले लहान बाळाचं मुंडकं.!
बारामती :-बारामती झपाट्याने विकसित होत असताना एमआयडीसी व  परिसरात कंपनी व लोकवस्ती जास्त असल्याने या भागात या ठिकाणी अनेकांनी इमारती बांधून रूम भाड्याने देण्याचा व त्यातून उत्पन्न निर्माण करण्याचा उधोग चालू केला आहे, यावेळी येणाऱ्या भाडेकरू हे सहसा बाहेरचे असून काही भाडेकरूमुळे मोठे गुन्हे घडले आहे ,अनेक वेळा या भागात महिला अत्याचार,बलात्कार, विनयभंग,मारहाण असे प्रकार घडले आहे,नेहमीच या भागात गुन्हे घडत असतात, तर काही अनैतिक संबंध असणारे व त्यातून घडलेल्या घटनेमुळे गुन्हे दाखल झाले आहे, त्यामुळे नुकताच सापडलेल्या लहान बाळाच मुंडकं सापडल्याने तर्क वितर्क काढले गेले, कदाचित यातील तर प्रकार नसेल ना?अशी चर्चा होताना दिसत होती, याबाबत मिळालेली माहिती अशी की,बारामती शहरातील सुर्यनगरी परिसरात काटेरी झुडपात एका लहान बाळाचं मुंडकं आढळून आलं आहे, हा प्रकार उघडकीस आला
आहे. केवळ मुंडकं आढळल्यानं खळबळ उडाली
असून बारामती तालुका पोलिसांनी तपास सुरु
केला आहे.बारामती शहरातील सुर्यनगरी येथे काही नागरीकांना हे मुंडकं दिसल्याने याबाबत नजीकच असणाऱ्या पोलीस स्टेशन येथील पोलिसांना माहिती देण्यात आली.त्यानंतर बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह वरीष्ठ पोलिस अधिकारी
घटनास्थळी दाखल होत अधिक माहिती घेतली.
धडाशिवाय केवळ मुंडकं आढळल्यामुळे शहरात
एकच खळबळ उडाली आहे. हे बाळ स्त्री जातीचे असावे असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.दरम्यान, हा प्रकार नेमका काय आहे याचा शोध घेण्याचं आव्हान बारामती तालुका पोलिसांसमोर उभे राहिले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

No comments:

Post a Comment