*बारामती शहर पोलीस बॉईज व युती आघाडी यांच्या वतीने मूकबधिर विद्यालय खाऊ वाटप*
बारामती : बारामती शहर पोलीस बॉईज असोसिएशन व बारामती शहर युवती आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती तालुक्यातील क-हावागज येथील निवासी मूकबधिर विद्यालयातील मुलांना प्रजासत्ताक दिनानिमित्त खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी मूकबधिर मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला होता. मुकबधिर मुलांच्या निवासी शाळा बऱ्याच आहेत परंतु निवासी मुकबधिर बिद्यालय क-हावागज ही शाळा इतर शाळांपेक्षा वेगळी आहे. येथे रस्त्यावर भीक मागणारी, पालकांसोबत मजुरी करणारी, परिस्थितीने गांजलेली, कोमेजलेली मुकबधिर मुले या संस्थेत आणून त्यांच्याबर प्रेमाची, मायेची फुंकर घालुन आपलेपणाच्या ओलाव्यात चिंब भिजवले जातात. ते सुध्दा या समाजाचाच घटक आहे असा विश्वास दिला जातो मग त्यांच्यातील आत्मविश्वास जागा होतो. या कार्यक्रमाला पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस संजय (नाना) दराडे, बारामती शहर अध्यक्ष शितल शहा, कोषाध्यक्ष विनीत किवै, कल्याण मोहिते, अँड. मेघराज नालंदे, युवती आघाडीच्या सचिव सृष्टी झगडे, पत्रकार माधव झगडे, श्वेता डोंगरे, अपूर्वा अढाव, दिव्या अढाव,शिवानी सुर्वे, विद्यालयाचे अध्यक्ष सचिन तावरे, मुख्याध्यापिका रामेश्वरी जाधव, विशेष शिक्षक अश्विनी भोसले, कर्मचारी काशिनाथ करचे, योगेश वळसे यादी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment