व्हिडीओ गेम पार्लरवर पोलिसांची धाड; इतके जण घेतले ताब्यात.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, January 18, 2024

व्हिडीओ गेम पार्लरवर पोलिसांची धाड; इतके जण घेतले ताब्यात..

व्हिडीओ गेम पार्लरवर पोलिसांची धाड; इतके जण घेतले ताब्यात..
कणकवली :- व्हिडिओ गेम पार्लरचा धुमाकूळ माजला असून कित्येक अल्पवयीन व तरुण याला नाहक बळी पडत आहे, नुकताच कणकवली शहरातील ५ व्हिडिओ गेम पार्लरवर कणकवली पोलिसांनी कारवाई करून ४४ मशीन व ४० हजाराची रोख रक्कमेसह सुमारे २ लाख ८७ हजाराचा ३७० रुपयाचा मुद्देमाल जप्त
करण्यात आला होता. याप्रकरणी संशयित राजु शिवराम जमादार ( ३७, रा.कणकवली-ठाकूरवाडी ), नितीन नारायण आळवे ( २५,
रा. देवगड ), राजेसाब बाबाजान संदिमणी ( २५, रा.बिडयेवाडी कणकवली ), शैलेश गोपाळ राणे ( ३६, रा.वरवडे- कोष्टीआळी ), शंकर विठ्ठल तायशेटे (४०, रा.हरकुळ ), विलास शंकरराव देसाई ( ५२, रा. मिरज-सांगली ), मुजीब मंहमद शेख (सावंतवाडी - उभाबाजार),अविनाश शिवाप्पा पाटील ( २९, रा. कणकवली-
बिजलीनगर ), रवींद्र श्रीपाद चव्हाण ( ४३, रा.
कणकवली- टेंबवाडी ), विष्णू गणपत परब ( ३७, रा.कणकवली- परबवाडी ), वैभव नागेश काळसेकर ( ३०,रा. कणकवली- बाजारपेठ ), गोपाळ महादेव काणेकर (३०, रा. आंब्रड ), किरण बाबुराव हनमशेठ ( ५१, रा.कर्नाटक- बेळगाव ) यांच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment