जाहिरात हा प्रत्येक व्यवसायाचा मेंदू - किरण पवार
बारामती(प्रतिनिधी): - बारामती बिजनेस चौक या माध्यमातून बारामती मधील व्यवसायिकांसाठी एक व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे. बारामती परिसरातील छोट्या मोठ्या व्यवसायिकांपासून सर्वच क्षेत्रातील लोकांचा यामध्ये समावेश आहे. "बीबीसी" च्या माध्यमातून वेगवेगळी चर्चासत्रे आयोजित केली जातात. संवाद दोन या सत्रात व्यवसाय वाढीसाठी जाहिरात व डिजिटल मार्केटिंग याविषयी फ्युजन ग्रुपचे संचालक किरण पवार यांनी आज उपस्थित व्यवसायिकांना मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम अमित देशपांडे यांच्या सेवन हेवन केक शॉप येथे सुभद्रा मॉल सिटी इन चौक येथे संपन्न झाला. प्रत्येक व्यवसाइकाने डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून करावयाच्या गोष्टी त्यातून व्यवसाय वाढीसाठी मिळणारा मार्ग याविषयी उपस्थित व्यवसायिकांनी उपयुक्त माहिती जाणून घेतली व यावर चर्चा केली बारामती व परिसरातून 41 व्यवसायिकांनी यामध्ये सहभाग नोंदवला.
No comments:
Post a Comment