भारतीय युवा पँथर संघटनेच्यावतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
फलटण : स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त फलटण नगरपरिषद शाळा क्रमांक ८ येथील विद्यार्थ्यांना भारतीय युवा पँथर संघटनेच्या वतीने शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी ॲड. जावेद मेटकरी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ग्राहक संरक्षण समिती भारत सरकार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.भारतीय युवा पँथर संघटना फलटण तालुका व शहरात खूप चांगले काम करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.सदर कार्यक्रमाचे आयोजन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मंगल ताई जाधव यांनी केले होते.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे आणि ॲड.जावेद मेटकरी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ग्राहक संरक्षण समिती भारत सरकार यांचे हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मंगल ताई जाधव,सातारा जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण काकडे,फलटण तालुका अध्यक्ष मंगेश इंगळे,फलटण तालुका महिला अध्यक्ष पुजा जगताप,फलटण तालुका संघटक संदिप पेठकर,फलटण तालुका उपाध्यक्ष पार्वती काळे, बारामती शहर अध्यक्ष निखिलभाई खरात, फलटण शहर अध्यक्ष रजिया शेख, झिरपवाडी शाखा अध्यक्ष रत्नदीप इंगळे,सामाजिक कार्यकर्ते सोमाभाऊ भोसले,सामजिक कार्यकर्ते विजयराव भोंडवे ,संघटनेचे सदस्य शीला अहिवळे,नितीन कुंभार उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक यांनी संघटनेचे आभार व्यक्त केले.
No comments:
Post a Comment