ED ची बारामतीत पवारांच्या बारामती अँग्रो सह ६ ठिकाणी छापेमारी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, January 5, 2024

ED ची बारामतीत पवारांच्या बारामती अँग्रो सह ६ ठिकाणी छापेमारी..

ED ची बारामतीत पवारांच्या बारामती अँग्रो सह ६ ठिकाणी छापेमारी..
बारामती:-राष्ट्रवादीचे शरद पवार यांचे नातू व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनी संबंधित ठिकाणांवर अंमलबजावणी संचालयाकडून छापे मारण्यात येत आहेत.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार अडचणींमध्ये वाढ झाली आहे. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनी संबंधित ठिकाणांवर
अंमलबजावणी संचालयाकडून (ED) छापे
मारण्यात येत आहेत. यामुळे शरद पवार कट्टर
समर्थक रोहित पवार हे अडकण्याची शक्यता आहे.शरद पवार गटातील रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी निगडित ठिकाणांवर ईडीने छापे मारल्यास आज (दि. 05) सुरुवात केली. पुणे,बारामती  ठिकाणी ईडीकडून
छापेमारी करण्यात आली. ईडीच्या पथकाने एकूण ६ ठिकाणी ही मारी सुरु केल्याची माहिती समोर येत आहे. रोहित पवार हे बारामती अॅग्रो कंपनीचे सीएओ आहेत. ईडीने मनी लॉन्ड्रीग प्रकरणामध्ये चौकशी सुरु केल्याने रोहित पवारांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.रोहित पवार यांचे काका अजित पवार हे सत्तेमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षामध्ये उभी फूट पडलेली बघायला मिळाली. यानंतर रोहित पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष अनेकदा पहायला मिळाला आहे. आता काका सत्तेमध्ये असल्यानंतर पुतण्याच्या कंपनीवर छापेमारी सुरु झाल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. रोहित पवार यांचे काका अजित पवार हे सत्तेमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षामध्ये उभी फूट पडलेली बघायला मिळाली. यानंतर रोहित पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष अनेकदा पहायला मिळाला आहे. आता काका सत्तेमध्ये असल्यानंतर पुतण्याच्या कंपनीवर छापेमारी सुरु झाल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.यापूर्वी देखील मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात बारामती ॲग्रो कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण विभागाने नोटीस दिली होती. या नोटिसमध्ये तासात प्लँट बंद करण्याची सूचना दिली होती. त्यावेळी आमदार रोहित पवार यांनी स्वतः ट्वीट करत याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर उच्च न्यायालयातून त्यांनी स्थगिती देखील मिळवली असल्याचे कळविणे.

No comments:

Post a Comment