RTO अधिकाऱ्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल;गोळी सुटली नव्हती तर झाडली होती.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, January 21, 2024

RTO अधिकाऱ्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल;गोळी सुटली नव्हती तर झाडली होती.!

RTO अधिकाऱ्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
 दाखल;गोळी सुटली नव्हती तर झाडली होती.!
बजाजनगर:-खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरटीओ विभागातील अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की,मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांच्यावरील गोळीबार प्रकरणी गुन्हे शाखेने महिला मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांना कलम ३०७ अन्वये
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी केले आहे. विशेष म्हणजे, घटनेमध्ये गोळी लागून जखमी झालेले संकेत गायकवाड यांना कलम २०१ नुसार पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आरोपी करण्यात आले आहे. दोघांनीही अटकपूर्ण जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज
दाखल केला आहे.प्रादेशिक परिवहन विभागाचे निरीक्षक संकेत भारत गायकवाड हे कर्तव्यावर जात असताना, ७ मे २०२२ ला सकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास होलस्टरमध्ये(रिव्हॉल्व्हर ठेवण्याचे कव्हर) रिव्हॉल्व्हर ठेवताना त्यांच्या
पायावरून उंदीर गेला. दचकल्याने गायकवाड यांच्या हातून रिव्हॉल्व्हर खाली पडले व त्यातून गोळी सुटली.ती उजव्या पायाच्या पोटरीत अडकली. त्यानंतर गीता शेजवळ व विरसेन ढवळे यांनी गायकवाड यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याप्रकरणाची बजाजनगर
पोलिसांनी नोंद घेतली. गुन्हे शाखेच्या तपासात पत्नीसह कोमल, वीरसेन ढवळे व गीता शेजवळ यांची साक्ष नोंदविल्यावर त्यात तफावत आढळली. त्यामुळे १२ जानेवारीला बजाजनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गायकवाड यांना ठार मारण्याचा प्रयत्न  केल्याचा गुन्हा दाखल केला.याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी संकेत गायकवाड यांच्यासह, त्यांच्या पत्नी कोमल, वीरसेन ढवळे व गीता शेजवळ यांना पोलिसांनी नोटीस बजावली.
त्यापैकी वीरसेन ढवळे यांनी बयाण नोंदविले. मात्र,शेजवळ व गायकवाड यांना दोनदा नोटीस बजावून चौकशीसाठी ते आले नाही. याउलट बुधवारी दोघांनी चौकशी टाळण्यासाठी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज सादर केला होता.याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.मात्र, यापूर्वी बजाजनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असताना, आता गुन्हे शाखेने गीता
शेजवळ यांच्यावर कलम ३०७ अन्वये खुनाचा प्रयत्न  केल्याप्रकरणी आणि संकेत गायकवाड यांना कलम २०१ नुसार पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आरोपी केले असल्याची
माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

No comments:

Post a Comment