अबब..१ कोटी ३६ लाखांचा ५६४ किलो गांजा जप्त;ओडिसा-आंध्रातला गांजा महाराष्ट्रात..
सोलापूर(प्रतिनिधी) :- ओडिसा, आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात गांजाची तस्करी करणाऱ्या सहा आरोपींना सापळा लावून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले. त्यांच्याकडून १ कोटी ३६ लाख ८३ हजार ५०० रुपये किमतीचा ५६४ किलो गांजा जप्त करण्यात आला. कोंडी आणि मोडनिंब गावाच्या हद्दीत सापळा लावून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
अल्ताफ युन्नूस इनामदार (वय ३८, चालक, रा. पिंपळी, ता. बारामती, जि. पुणे), चालक जमीर इब्राहिम शेख (वय ३५, रा. सिद्धेश्वर गल्ली, बारामती, जि. पुणे), कदीर आसिफ पठाण (वय ३८, रा. आदर्श चौक, मोहोळ), प्रकाश संतोष बारटक्के, मजूर, रा. तेलंगवाडी, ता. मोहोळ), ऋषिकेश ऊर्फ देवानंद शिंदे (वय २७, चालक, रा, तेलंगवाडी, ता. मोहोळ), संतोष तुकाराम कदम (वय ४३, मजूर, रा. लवंगी, ता. माळशिरस) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. लाला बागवान (रा. बारामती), सुरेश दुधनीकर (रा. पुणे) व राजकुमार बाळासाहेब घोलप (रा. तेलंगवाडी, ता. मोहोळ) हे गुन्ह्यातील वाँटेड आरोपी आहेत. १९ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेने सोलापूर ते पुणे जाणाऱ्या रोडवर कोंडी गावच्या हद्दीत सापळा लावला. चारचाकी वाहनाचा पाठलाग करून वरील दोन आरोपींना पिकअपसह ताब्यात घेतले. वाहनाच्या झडतीमध्ये ४५९ किलो ३४० ग्रॅम गांजा, अन्य साहित्यासह १ कोटी ४६ हजार ९०० रुपयांचा अवैध 'गांजा' आढळला.
*ही कामगिरी पोलिस अधीक्षक,*
शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक, प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सपोनि धनंजय पोरे, फौजदार सूरज निंबाळकर यांच्या पथकातील फौजदार राजेश गायकवाड, सहा. फौजदार महमद इसाक मुजावर, श्रीकांत गायकवाड, नारायण गोलेकर, नीलकंठ जाधवर, हवालदार धनाजी गाडे, परशुराम शिंदे, सलीम बागवान, विजयकुमार भरले, हरिदास पांढरे, पोलिस यश देवकते, अक्षय डोंगरे, समर्थ गाजरे, विनायक घोरपडे, समीर शेख, दिलीप थोरात, सतीश कापरे, व्यंकटेश मोरे, रतन जाधव यांनी बजावली.
No comments:
Post a Comment