कारभारी प्रिमिअर लिग (KPL) 2024’’ च्या माध्यमातुन बारामतीत रंगणार क्रिकेटचा थरार" - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, March 18, 2024

कारभारी प्रिमिअर लिग (KPL) 2024’’ च्या माध्यमातुन बारामतीत रंगणार क्रिकेटचा थरार"


कारभारी प्रिमिअर लिग (KPL) 2024’’ च्या माध्यमातुन बारामतीत रंगणार क्रिकेटचा थरार"
बारामती:- महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने दिनांक 20/03/2024 ते 04/04/2024 दरम्यान बारामती येथे संपूर्ण भारत देशातुन सहभागी होणाÚया 16 नामांकीत खेळाडूंचा भरणा असलेल्या संघामध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयम येथे ‘कारभारी प्रिमिअर लिग (KPL) 2024’ च्या माध्यमातुन क्रिकेटचा थरार बारामती व पंचक्रोशीतील क्रिकेट रसिकांना अनुभविण्यास मिळणार आहे. 
या स्पर्धेमध्ये कर्नाटक, मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, जळगांव, बारामती, इंदापूर आशा विविध जिल्हा व परराज्यातून 100 हून अधिक रणजीपट्टूंचा भरणा असलेले संघ सहभागी झालेले आहेत.
या स्पर्धेच्या माध्यमातुन बारामती व पंचक्रोशीतील क्रिकेट खेळाडूंना भारतातील अनेक प्रतिभावान खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी मिळून त्यांच्या क्रिकेटच्या ज्ञानामध्ये भर पडावी याकरिता दर वर्षी कारभारी प्रिमिअर लिगचे आयोजन मोठ्या दिमाखात केले जाते.
स्पर्धेचे दिमाखदार आयोजन, रक्कम रू. 5.00 लाख व चषक इत्यादी भरघोस बक्षिसे तसेच स्पर्धेमध्ये सहभागी होणार्या खेळाडूंकरीता बँ्रडेड कलर किट, भरघोस वैयक्तीक रोख बक्षिसे, एनर्जी ड्रिंक, फ्रुट बास्केट, प्रत्येक संघास 3 लिग मॅच, प्रत्येक सामन्यात मॅन आॅफ द मॅच, मॅन आॅफ द सिरीजसाठी इलेक्ट्रीक बाईक, अंतर राष्ट्रीय दर्जाचे यु-ट्युब लाईव्ह प्रक्षेपण, सोशल मिडीया कव्हरेज, थर्ड अंपायर सुविधा, डब्। मान्यताप्राप्त अंपायर (पंच) अशा विविध वैशिष्टपूर्ण स्पर्धेचे संपूर्ण बारामती व पंचक्रोशीतील क्रिकेट रसिकांनी आनंद घ्यावा असे आवाहन स्पर्धेचे आयोजक श्री. प्रशांत (नाना) सातव यांनी यावेळी केले. 

No comments:

Post a Comment