प्रा.रमेश मोरे यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, March 18, 2024

प्रा.रमेश मोरे यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान..

प्रा.रमेश मोरे यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान..
बारामती:- लोकराजा शाहू छत्रपती चॅरिटेबल ट्रस्ट- इचलकरंजी, जि. कोल्हापूर या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या शाहू महोत्सवात तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील शिक्षक रमेश मोरे यांना आदर्श शिक्षक राज्यस्तरीय लोकराजा शाहू पुरस्कार मा.खासदार राजू शेट्टी यांच्या शुभहस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. यावेळी माजी सभापती सचिन शिंदे, माजी सरपंच अण्णासाहेब राजमाने, प्रा.संदिप राजमाने उपस्थित होते.
कनिष्ठ महाविद्यालयामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मराठी विभागांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. २००२-०७ या काळात त्यांनी बारामती नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून काम केले आहे. महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्यासाठी ते व्याख्याने देत असतात.
रमेश मोरे यांना प्राप्त झालेल्या पुरस्काराबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप उपप्राचार्य डॉ.अशोक काळंगे डॉ.सचिन गाडेकर, रजिस्ट्रार अभिनंदन शहा, उपप्राचार्या वैशाली माळी, समन्वयक गोरखनाथ मोरे, संजय शेंडे यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर), सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर) आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment