चमकोगिरी नेत्यांच्या बुडाखाली येतात खुर्च्या !कार्यकर्त्यांच्या नशिबी फक्त मोर्चा अन चर्चा !! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, March 16, 2024

चमकोगिरी नेत्यांच्या बुडाखाली येतात खुर्च्या !कार्यकर्त्यांच्या नशिबी फक्त मोर्चा अन चर्चा !!

बारामती:-सद्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे,या वातावरणात सर्व सामान्य कार्यकर्ते मात्र अन्नभिन्न झाले असल्याचे दिसतंय, मात्र खुर्ची व प्रतिष्ठा यासाठी काही तथाकथित नेते पुढारी जे चमकोगिरी करण्यात मात्र प्रामुख्याने पुढे असतात नव्हे तशी त्यांना सवयच होऊन गेली असल्याचे त्यांच्या कृतीतून दिसत आहे याची त्यांनाही जाणीव आहे (असो शेवटी चाटुगिरी करण्याला वाव आहे)हे सर्वसामान्य व प्रामाणिक काम करणाऱ्याला  आताच कळणार नाही पण जेव्हा कळेलतेव्हा प्रगतीची वेळ निघून गेलेली असणार, त्यावेळीतुमच्या कडे पैसा, प्रतिष्ठा, उमेदीचं वय, काहीचनसणार.लग्न झालं नसेल तर कोणी पोरगी द्यायला सुद्धा तयारहोणार नाही.हा बऱ्याच तरुण मित्रांचा अनुभव आहे आणि अनुभवहीच खात्री असते. हल्ली प्रत्येक ठिकाणी भाऊ, दादा,तात्या, अण्णा, बाबा, काका, साहेब अश्या वेगवेगळ्यानावाचे नेते, भुरटे नेते, डॉन, आधारस्तंभ, यांचासुळसुळाट झालाय. काहींच्या गळ्यात तर कुत्र्यालाशोभेल अश्या साखळ्या, कपाळावर वाकडे तिकडेगंध, हातात बैलाला शोभेल असले गंडे-दोरे, कडे-कुडेअसतात.कोल्हापुरी चपला, स्टार्च केलेले कडक पांढरे कपडेअन गाडी नंबरपासून ते अगदी मोबाईल नंबरपर्यंतत्यांचं सगळंच कसं व्हीआयपी असतं. पण ते कसंआलं हे विचारू नका कारण त्याच्या सर्व वाटा त्यांनामाहीत असतात. त्यांना ते सगळ चालतं अन जमतंदेखील.दुर्दैवाने त्यांच्या याच चमकोगिरी कडे तुमच्या माझ्यासारखी ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असणारी तरुणमुले आकर्षित होतात अन नेत्यांना ही सगळ्या गोष्टीलाकार्यकर्ते हवे असतात.खरतर तरुण वय हे'लाथ मारिन तिथं पाणी काढणारं' वय असतं.या वयात जीवणाची दिशा ठरते, या वयात आपल्याहातात पुस्तके, पेन, लेख, लेखक, व्याख्यान असायलापाहिजे पण आपण हाती घेतो ते वेवेगळ्या पार्टीचेझेंडे, गमजे, मेळावे, सभा.., असा सगळा खेळ सुरूहोतो.त्याच्या बदल्यात तरुण तडफदार कार्यकर्त्यांना कधी-मधी धाब्यावर जेवण अन एखादी चपटी आणि कसलेतरी नावाला चुटुक मुटुक असं काहीतरी सेलचे चिटणीस, प्रमुख, अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, शाखाध्यक्ष, पददिलं जातं.मग तो बनतो युवा नेता (नेता कसला कार्यकर्ताच)बाकी काही नाही.असले पदं ही त्यांनी ढिगानी तयार करून ठेवलेलीअसतात. मग तो प्रचार असो की अन्य काहीहीकार्यक्रम,साहेब तुम आगे बढो, साहेब अंगार है बाकी सब भंगारहै,कोण आला रे कोण आला, गोर गरिबांचा बुलंदआवाज,येऊन येऊन येणार कोण, पासून ते अगदी झिंदाबाद,झिंदाबाद.पर्यंत घसा फाटुस्तवर घोषणा देतो.त्यातील काही कार्यकर्ते हे गावातील, सरकारी ऑफिसमधील दुबळ्या वर्गावर, वेटर वर, किंवा गरीब लोकांवरनेतेगिरी गाजवतात पण साहेबांच्या सतरंज्या उचलणे,साहेब आल्यावर फटाक्यांची माळ पटवणे, पॉम्प्लेटवाटणे ते अगदी झेंडे लावण्यापर्यंत सगळी कामंकरतात.भरीस भर म्हणून आजच्या जमाण्यात तर सोशलमीडिया सारखं जालीम व्यासपीठ उपलब्ध असल्यानेत्यांवर सतत वेगवेगळे उद्योग करतात. इकडं त्यांचेआई-बाप दिवसभर शेतात राबतात अन ते सोशलमीडियावर जाळ धूर काढत बसतात.अधून-मधून वेगवेगळ्या गटा-तटाची कार्यकर्ते एक-मेकावर तुटून पडतात. बघता काय रागानं पासून सुरवात होते ते अगदी बॉस,किंग, राजा, वादळ, भाऊ चा दरारा, घासून नाही तरठासून येणार,,,अश्या वेगवेगळ्या प्रकारच्या आभासी दुनियेत रममाणहोऊन नाद खुळा होईपर्यंत आरोप प्रत्यारोपाच्या फैरीझाडतात.कधी-कधी एक मेकांच्या आई-बहिणीचा उद्धार केलाजातो, प्रचंड बॅनरबाजी, नाराजी होते, यावरूनच कधी-कधी एकमेकांचे मुडदे पडण्यापर्यंत ही कट्टरता जाते.बऱ्याचदा त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना हा आपला कट्टरकार्यकर्ता आहे याची कल्पना देखील नसते.फक्त कधी-कधी गर्दीत नेत्यांसोबत एक सेल्फी भेटलातरी कार्यकर्त्याना जेवणाची गरज भासत नाही एवढीऊर्जा त्यांच्या अंगी संचारते.असं करता करता इकडं जिंदगीच्या कधी पिपाण्याहोऊन जातात हे कळत देखील नाही.मित्रांनो हल्ली पुढाऱ्यांच्या मागे फिरणाऱ्यांची संख्याकमालीची वाढत चालली आहे. पुढारी देखील यालाआवर घालत नाहीत कारण तसे करणे म्हणजेमटणाच्या दुकानदाराने शाकाहारी होण्याससांगण्यासारखे आहे.दुसऱ्याअंगाने विचार केला तर या सगळ्या खेळालाफक्त नेतेच जबाबदार नाहीत त्याला समाज म्हणूनतुम्ही आम्ही पण तेवढेच जबाबदार असतो.या उलट नेत्यांना ही एवढ्या सगळ्या लोकांची मर्जीराखणे, मन सांभाळणे, खर्च पेलणे, ऊन-वारा-पावसातरात्रंदिवस प्रवास करणे, सगळ्यांच्या कार्यक्रमाला  हजेरी लावणे, कुटुंबाला वेळ देता न येणे, रोज शेकडोलोकांचे फोन घेणे, शेकडो लोकांना भेटणे, कामे करणे,बऱ्याच गोष्टीची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेणे,प्रतिस्पर्ध्याचा सामना करणे, पक्षश्रेष्टीचा विश्वाससंपादन करणे, सतत निवडणुका लढणे, अशीजिकरीची कामं पार पाडावी लागतात. त्यामुळे आपणत्यांनाही ही पूर्णपणे दोष देऊच शकत नाहीत. टाळीनेहमी दोन हाताने वाजत असते.विचार करण्यासारखी गोष्ट आहे, राजकारण हे काहीसगळ्यांचंच करिअर होऊ शकत नाही.तरी देखील कार्यकर्ता होण्याची खूपच तीव्र इच्छाअसेल तर काही सूत्रसंचालक, ड्रायव्हर, अंगरक्षक,P.A व्हा. कोणतीही कला शिका, अभ्यास करा, भाषणेलिहून द्या.जमलं तर एखाद्या मोठ्या, चांगल्या नेत्या सोबत फिरा.त्यांच्याकडून तुमच्या कामाचा योग्य तो मोबदला घ्या.नेता तुमच्या अडी-अडचणीला तुमच्यामागे उभा राहतअसेल, तुमचा पोटा पाण्याचा प्रश्न सोडवत असेल, तरफिरण्यात ही अर्थ आहे.नाहीतर सगळी कामं करायला तुम्ही पण तिकीटद्यायच्या वेळी, किंवा काही फायदा व्हायच्या वेळीकाही ठराविक लोकांना लाभ भेटणार असेल, नेत्यालात्याच्या नातेवाईक, कुटुंबातील, किंवा ईतर पैश्यावालेचलोकं दिसत असतील तर ताबडतोब मार्ग बदललापाहिजे.कधी-कधी काही नेते आपल्या भडकाऊ कृतीने,भाषणाने तुम्हा आम्हात, कधी जातीच्या, कधी धर्माच्यातर कधी कशाच्या बहाण्याने भांडणे लावून देत असतील तर दूर रहा. कारण इकडं आपण लगेचजाळपोळ, मारामाऱ्या करत बसतो.तिकडे मात्र दिवसा एकमेकांचे शत्रू असलेले,व्यासपीठावरून एकमेकांवर चिखलफेक करणारेसगळे नेते रात्री एका ताटात जेवायला असतात.कारण राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्रकिंवा शत्रू असत नाही. आपण मात्र एकमेकांचा जीवघ्यायला निघतो.आयुष्यभरासाठी एकमेकांचे वैरी बनतो. कोर्ट कचेरीतअडकतो. कधी एखाद्या नेत्याचा मुलगा दंगलीतजखमी झालाय किंवा जाळपोळात अडकला आहेअसं ऐकलंय का ?? असं सहसा होत नाही किंवाअडकला तरी त्यांना वरदहस्त असतो ते लगेच सुटतातदेखील.त्यामुळे विचार करा, आपल्या अडी-अडचणीच्या वेळीफक्त कुटुंबीय, मित्र आणि नातेवाईक असतात.मित्रांनो पूर्वीच्या काळात तरी राजकारण तत्वाचं,निष्ठेचं अन इमानदारीचं होतं. आता ते राहिलं नाही.अजूनही ही खूप चांगले राजकारणी आहेत पणअलीकडच्या काळात राजकारणात धूर्त, लबाडलोकांची संख्या वाढतेय.त्यामुळे तुम्ही तुमचा वेळ हा करियर,काम, धंदा, आरोग्य, कुटुंब या साठी कारणी लावुन,आरोग्य, नाव, पैसा, इज्जत कमवली तर हेच नेतेभविष्यात तुमच्या मागे पुढे ही करतील. आपल्याकडेएकदा पैसा अडका जमा झाला की भविष्यात देखीलतुम्ही निवडणूक लढवू शकता. काही सामाजिक काम करू शकता आणि नेता हीहोऊ शकता. नाहीतर नेत्याचा मुलगा युवा नेता बनतोअन कार्यकर्त्याचा मुलगा युवा कार्यकर्ता !!नेत्यांच्या हातात झेंडा आहे अन कार्यकर्त्याच्याहातात फक्त दांडा आहे. कधी कधी झेंडा वरच्या वरीबदलला जातो. दांडा अन दांडा धरणारा मात्र तसाचराहतो ही खंत आहे. त्यामुळे विचार करा, इतरांनाआपण मोठं करू शकतो तर आपण का नाही मोठेहोऊ शकत ?फक्त मार्ग बदलावा लागेल असं देखील एका हुशार व्यक्तीनें या ठिकाणी लिखाणात मांडणी केली आहे.

No comments:

Post a Comment