धक्कादायक..दोघांचे कपडे बळजबरीने काढायला लावत त्यांचे नको त्या अवस्थेतील फोटो काढत चाकूचा धाक दाखवून दागिने केले लंपास.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, May 12, 2024

धक्कादायक..दोघांचे कपडे बळजबरीने काढायला लावत त्यांचे नको त्या अवस्थेतील फोटो काढत चाकूचा धाक दाखवून दागिने केले लंपास..

धक्कादायक..दोघांचे कपडे बळजबरीने काढायला लावत त्यांचे नको त्या अवस्थेतील फोटो काढत चाकूचा धाक दाखवून दागिने केले लंपास.. 
बारामती :-नुकतीच शाळकरी मुलीला रिक्षा वाल्याने निर्जन स्थळी नेऊन चुकीचे काम करीत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने संतप्त पालकांनी आवाज उठविल्याने वरीष्ठ पोलीस अधिकारी यांनी या व्हायरल व्हिडिओ कसून तपास करून आरोपी अटक केला असतानाच बारामतीत महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेली एक युवती गाडीतून आपल्या मित्रासह बारामती विमानतळ परिसरात फिरण्यासाठी गेली होती. ते
मोटारीत बसले असता तेथे आलेल्या दोघा अज्ञातांनी चाकूचा धाक दाखवत युवतीच्या अंगावरील ९० हजारांचे दागिने बळजबरीने लंपास केले. तसेच दोघांचे कपडे बळजबरीने काढायला लावत त्यांचे नको त्या अवस्थेतील फोटो काढून घेतले. तसेच हे फोटो व्हायरल
करण्याची धमकीही दिली. तसेच तिच्या
मित्राला बेदम मारहाण केली.याप्रकरणी संबंधित २१ वर्षीय युवतीने फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघा अनोळखी व्यक्तींविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी (दि. १०) सायंकाळी साडेसातच्या सुमारास
गोजुबावी हद्दीत बारामती विमानतळाजवळ ही घटना घडली. फिर्यादी तरुणीचे वडील पोलिस खात्यात काम करीत असल्याचे कळतंय.ती बारामतीत शिक्षणानिमित्त राहत होती.शुक्रवारी ती मित्रासह गाडीतून बारामती विमानतळाच्या बाजूला फिरण्यासाठी गेली. तेथे गाडीत गप्पा मारत असताना ३० ते ३५ वयोगटातील तोंडाला मास्क लावलेले दोघे इसम तेथे आले. त्यांनी
युवतीसह तिच्या मित्राला चाकूचा धाक दाखवून युवतीच्या गळ्यातील ७० हजारांची सोन्याची साखळी व कानातील टॉप्स असे ९० हजारांचे दागिने काढून घेतले. त्यानंतर त्या दोघांनी तिच्या
मित्राला दगडाने मारहाण केली.दोघांनाही गाडीतून बाहेर काढत खड्डा असलेल्या ठिकाणी नेत त्यांच्या अंगावरील कपडे जबरदस्तीने
उतरवायला भाग पाडत त्यांचे त्या अवस्थेतील फोटो काढून घेतले.तिच्याकडील फोनवरून कोणाला तरी फोन करीत, तुला फोटो पाठविले आहेत,बघून घे, असे म्हणत फोन कट केला.
पोलिसांत गेलात तर तुमचे काढलेले फोटो व्हायरल करू, अशी धमकी देण्यात आली.त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत असणारी युवती युवक यांनी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असल्याचे समजले.

No comments:

Post a Comment