धक्कादायक..लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्ष ठेवले शारीरिक संबंध;बापलेकाविरुद्ध ॲट्रॉसिटी व बलात्काराचा गुन्हा दाखल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, May 26, 2024

धक्कादायक..लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्ष ठेवले शारीरिक संबंध;बापलेकाविरुद्ध ॲट्रॉसिटी व बलात्काराचा गुन्हा दाखल..

धक्कादायक..लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्ष ठेवले शारीरिक संबंध;बापलेकाविरुद्ध ॲट्रॉसिटी व बलात्काराचा गुन्हा दाखल..
बारामती:-महिला अत्याचार होत असल्याचे वाढत असलेल्या गुन्हावरून पुन्हा स्पष्ट झाले असले तरी याबाबत कडक पाऊले उचलणे गरजेचे आहे, कधी खरे गुन्हे होतात तर कधी खोटे गुन्हे दाखल होतात याब6योग्य तपास करून कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरत आहे, नुकताच बारामतीत लग्नाचे अमिष दाखवून सन 2022 ते 24
दरम्यान बारामतीसह पाचगणी व महाबळेश्वर मध्ये जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले व जातीवाचक उल्लेख केला कारणावरून पिडितेने दिलेल्या या तक्रारीवरून बारामती शहर पोलिसांनी बापलेकाविरोधात बलात्कार
व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी जामदार रोड येथील
अक्षय विजय निगडे व त्याचे वडील विजय
निगडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला
आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा
गुन्हा 7 जुलै 2022 ते 5 मे 2019 दरम्यान
वेळोवेळी घडला. या घटनेतील पीडित
फिर्यादी पंचवीस वर्षाची आहे.पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार या दोन वर्षाच्या दरम्यान अक्षय निगडे याने लग्नाचे आमिष दाखवले व इच्छेविरोधात जबरीने शारीरिक संबंध ठेवला व त्यानंतर तू अमुक जातीची आहे व मी मराठा
जातीचा आहे असे सांगून तुझ्याशी लग्न
केल्यास माझी समाजात इज्जत राहणार
नाही, असे म्हणून अपमान केला व त्याचे
वडील विजय निगडे यांनी तू येथून निघून
जा नाहीतर तुझ्यावरच केस करून तुला
खोट्या केसमध्ये गुंतविल अशी दमदाटी
करून हाकलून लावले. या घटनेचा पुढील
तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड करीत आहे.

No comments:

Post a Comment