खळबळजनक..बारामतीत पुन्हा एका महिलेने घेतली गळफास.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 29, 2024

खळबळजनक..बारामतीत पुन्हा एका महिलेने घेतली गळफास..

खळबळजनक..बारामतीत पुन्हा एका महिलेने घेतली गळफास..
बारामती:-बारामतीत दोन दिवसात दोन वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्याने एकच खळबळ उडाली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बारामती शहरला
डॉक्टर सरदेसाई, मेडिकल कॉलेज बारामती.यांनी खबर दिल्याने दि -29/05/24 रोजी पहाटे 05/00 पूर्वी घडलेल्या घटनेची माहितीनुसार यातील मयत महिला  स्नेहा संदीप मेंनसे वय 50 वर्ष राहणार सहयोग सोसायटी बारामती शहर यांनी त्यांचे राहते घरी पहाटे साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने रजिस्टरी मयत दाखल करण्यात आली असून घटनेच्या ओळी मयत स्वतः व त्यांचा मुलगा अजिंक्य संदीप मेणसे  वय 28 वर्ष असे दोघेच घरी राहणेच होते. पोस्टमार्टम मध्ये सदरचा मृत्यू हा गळफास घेतल्याने झाल्याचे निष्पन्न झाली आहे.
 पुढील तपास बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे हे करत आहेत.सदर या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरली असल्याने या बाबत उलट सुलट चर्चा होत होत्या यामागे नक्की काय प्रकार घडला असावा, कौटुंबिक वाद तर नसेल ना?की आत्महत्या करण्यापर्यत पाऊलं उचलली गेली, नुकताच भिगवण रोड नजीक एका सुनेने गळफास घेतल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा याच भिगवण रोड नजीक दुसरी घटना घडल्याने बारामतीत खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आले आहे.

No comments:

Post a Comment