जातीवाचक शिवीगाळ करत त्या तिघांनी लाथाबुक्क्याने मारहाण केल्याचा गुन्हा दाखल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, June 14, 2024

जातीवाचक शिवीगाळ करत त्या तिघांनी लाथाबुक्क्याने मारहाण केल्याचा गुन्हा दाखल..

जातीवाचक शिवीगाळ करत त्या तिघांनी लाथाबुक्क्याने मारहाण केल्याचा गुन्हा दाखल.. 
बारामती:-बारामती शहरातील तांदूळवाडी वेस येथे नुकताच चाकू हल्ला झाल्याची तक्रार दाखल झाली होती याच घटनेतील दुसऱ्या पार्टीने केलेली तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून परस्पर विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी नयना नितिन चव्हाण वय 35 वर्षे धंदा -इस्त्री दुकान, जात- ** रा. तांदुळवाडी वेस ता. बारामती जि. पुणे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार 1) निलेश सुभाष चव्हाण वय 41 वर्षे, 2) सुभाष यमनाथ चव्हाण वय 70 वर्षे, 3) चंदा सुभाष चव्हाण वय 60 वर्षे सर्व रा. तांदुळवाडी वेस ता. बारामती जि.पुणे यांच्यावर बारामती शहर पोलीस स्टेशन गु र नं. 450/2024 भा.द.वि.क. 452,354,324,427,504,34.अ.जा.ज.अ.प्र कायदा 1989 चे कलम 3(1)(w)(i).3(1)(r)(s),3(2)(Va)कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला यावेळी मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांनी फिर्याद दिली की, दिनांक 13/06/2024 रोजी दुपारी 3/30 वा.चे सुमारास माझे पती हे माझे दिर नामे निलेश सुभाष चव्हाण यास तु तुझ्या वडीलांना निट सांग ते माझे पत्नी नयना हिंस तिचे माहेरचे जातिवरून दिनांक 11/06/2024 रोजी शिवीगाळ करत होते तु त्यांना समजावुन सांग असे म्हणाले असता. माझे दिर निलेश यांने माझे पती यास हाताने लाथाबुक्क्यांने मारहाण करू लागला. व त्याने तेथील फरशी उचलून माझे पतीला मारले त्यामुळे पतीच्या हाताला मार लागला असुन मी मध्ये भांडण सोडविण्यासाठी गेली असता माझा दिर निलेश यांने माझे छातीला हाताने पकडून माझे मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले तेव्हा तेथे माझे चुलत सासरे सुभाष यमनाथ चव्हाण, सासु चंदा चव्हाण हे त्या ठिकाणी आले. माझे चुलत सासरे यांनी तेथील पडलेली फरशीने माझे डोक्यामध्ये पाठीमागील बाजुस मारल्याने माझे डोकीस सूज आली आहे. माझी चुलत सासु चंदा चव्हाण हिने मला दगड फेकुन मारला, परंतु तो मला लागला नाही. माझा चुलत दिर निलेश चव्हाण हा मला म्हणत होता की, तु **ची आहे माझे भावा सोबत कसे काय लग्न केले. तु या घरात कशी राहते हे मी बघतो. असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली, त्यानंतर त्या तिघांनी मला व माझे पती यांना हाताने लाथाबुक्क्याने मारहाण केली. भांडणा दरम्यान माझे चुलत सासरे सुभाष  चव्हाण व चुलत दिर निलेश चव्हाण तसेच सासु चंदा चव्हाण यांना सुध्दा मार लागला आहे. त्यानंतर माझे चुलत सासरे यांचे घरातील लोक आल्याने मी व माझे पती तेथुन निघुन गेलो. काही वेळाने मला समजले की, माझे घरातील सामानाची तोडफोड माझे चुलत सासरे सुभाष चव्हाण ह्यांचे घरातील लोकांनी केली आहे. म्हणनु मी माझा भाऊ सचिन आवळे यांचे सोबत जाऊन पाहणी केली असता मोटार सायकल तसेच घरातील सर्व सामानाची तोडफोड करून नुकसान केले आहे. म्हणून माझी (1) निलेश सुभाष चव्हाण वय 41 वर्षे, 2) सुभाष यमनाथ चव्हाण यय 70 वर्षे, 3) चंदा सुभाष चव्हाण वय 60 वर्ष सर्व रा. तांदुळवाडी वेस ता. बारामती जि. पुणे यांच्या विरूध्द कायदेशिर फिर्याद आली असून सपोनि चेके यांनी दाखल करून घेतली तर तपास सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी करीत आहे.

No comments:

Post a Comment