बारामतीत घर वाटून देत नसल्याच्या रागातून चाकू व दांडक्याने तिघांवर हल्ला.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, June 13, 2024

बारामतीत घर वाटून देत नसल्याच्या रागातून चाकू व दांडक्याने तिघांवर हल्ला..

बारामतीत घर वाटून देत नसल्याच्या रागातून चाकू व दांडक्याने तिघांवर हल्ला..
बारामती:- बारामतीत चाकू,कोयता व घातक हत्यार वापरून अनेक जीवघेणे हल्ले झाल्याचे दिसून आले आहेत यांच्यावर कायदाचा धाक उरला नसून असे गुन्हे घडतच असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली,नुकताच घर वाटून देत नसल्याचे रागातून चाकू हल्ला झाल्याचे पुढे आले याबाबत निलेश सुभाष चव्हाण वय 41 वर्षे धंदा मार्केटींग रा. तांदुळवाडी वेस बारामती ता बारामती जि पुणे  यांनी दिलेल्या फिर्यादी वरून
 आरोपीचे नाव  1) नितिन सुरेश चव्हाण, 2) नयना नितिन चव्हाण दोघे रा तांदुळवाडी वेस बारामती ता  बारामती जि पुणे यांनी दि 13/6/2024 रोजी 15/30 वा चे सुमारास केलेल्या गुन्हयात वापरलेले हत्यार 1) चाकू, 2) लाकडी दांडा वापरून मारहाण केल्याचे सांगण्यात आले यानुसार बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं.448/2024 भादवी कलम 307,324,504,506,34 कलमानुसार गुन्हा दाखल झाला असून,याबाबत मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी यांनी फिर्याद दिली की,दि. 13/6/2024 रोजी दुपारी 3/30 वा च्या सुमारास मी कामावरून घरी आलो तेव्हा माझा चुलत भाऊ नितिन हा माझ्या घरासमोर आला त्याच्या सोबत त्याची बायको नयना ही सुद्धा आली व मला घरातुन बोलावून घेतले त्यावेळी माझे आई वडील थेरेपीला गेले होते माझी भावजय सिमा घरामध्ये होती नितिन व त्याची बायको मला शिवीगाळ करू लागले व तुझे वडील कोठे गेलेत माझे घर मला वाटून देत नाहीत त्यांना खल्लास करतो असे म्हणून दोघेही शिवीगाळ करत असताना नयना हिने अचानक तिच्याजवळ लपून आणलेल्या चाकूने माझ्या पोटात मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी सावधपणे चाकू पकडला तो माझ्या हाताला कापला तेवढ्यात माझे आई वडील तेथे आले त्यावेळी नितीन याने त्याच्या बायकोच्या हातातील चाकू घेऊन आता याला खल्लास करतो असे म्हणून वडिलांच्या पोटात चाकू खुपसला त्यावेळी मी त्यास पकडण्यास गेलो असता त्याने तोंडावर डाव्या बाजूस चाकूचा वार केला त्यामध्ये माझ्या तोंडावर लांब पर्यंत जखम झाली आहे माझी आई त्यावेळी सोडविण्यास आली असताना आईच्या डोक्यात नयना हिने लाकडी दांडा मारला त्यामध्ये माझी आई चक्कर येऊन पडली त्यावेळी मी आरडा ओरडा केला त्यावेळी नितीन व नयना दोघेही पळून गेले सदरचा प्रकार माझा पुतण्या आदित्य, भाऊजय सौ सीमा, तानाजी अशोक चौगुले व इतर लोकांनी पाहिला आहे मी वडिलांना तानाजी चौगुले यांच्या मदतीने बारामती हॉस्पिटल येथे घेऊन आलो माझ्यावर व वडिलांवर औषधोपचार चालू आहे तरी माझी 1) नितिन सुरेश चव्हाण, 2) नयना नितिन चव्हाण दोघे राहणार तांदूळवाडी वेस बारामती तालुका बारामती जिल्हा पुणे यांच्या विरोधात तक्रार दाखल आहे या घटनेचा तपास अंमलदार सपोनि चेके करीत आहे.

No comments:

Post a Comment