खासदार सुप्रिया ताई सुळे यांचा बारामतीत सत्कार..
बारामती:-देशात गाजलेल्या लोकसभा निवडणुकीत खास करून बारामती लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते,अटीतटीच्या या लढ्यात खऱ्या अर्थाने संघर्ष योद्धा म्हणून संबोधले गेलेले मा.शरद पवार साहेब यांच्यावर असलेले प्रेम जनतेनी मता तुन सौ सुप्रियाताई सुळे यांना मोठ्या मतांनी निवडून दिले याच पाश्र्वभूमीवर बारामतीत निवडणूक जिंकल्या नंतर आले असता युगेंद्रदादा पवार विचार मंचा च्या वतीने नवनिर्वाचित खासदार सौ.सुप्रिया ताई सुळे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. निवडणुकी नंतर आज ताई प्रथमच बारामतीत आल्या होत्या. या प्रसंगी युगेंद्रदादा पवार हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन जयकुमार काळे, सरचिटणीस पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व अस्लम तांबोळी शहर अध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग यांनी केले होते. सदर कार्यक्रमास मोठा जनसमुदाय मोठ्या उत्साहाने उपस्थित होता.
No comments:
Post a Comment