बारामतीत मुस्लिम बांधवांचे प्रशासकीय इमारत गेट समोर धरणे आंदोलन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, August 23, 2024

बारामतीत मुस्लिम बांधवांचे प्रशासकीय इमारत गेट समोर धरणे आंदोलन..

बारामतीत मुस्लिम बांधवांचे प्रशासकीय इमारत गेट समोर धरणे आंदोलन..
बारामती:- उपविभागीय अधिकारी बारामती विभाग बारामती, जि. पुणे,पोलीस निरीक्षक-बारामती शहर पोलीस स्टेशन
ता. बारामती, जि. पुणे., उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभागीय बारामती,जि. पुणे.यांना लेखी निवेदन दिले होते यामध्ये दि. २३/०८/२०२४ रोजी दुपारी २.०० वाजले पासून उपविभागीय अधिकारी
कार्यालय प्रशासकीय इमारत गेट समोर धरणे आंदोलन करणार असून तक्रारी अर्ज करतो की, रामगिरी गुरुनारायण
गिरी महाराज ( सरला बेट) यांनी मौजे पंचायत सिन्नर, जिल्हा नाशिक या ठिकाणी सप्ताह
दरम्यान प्रवचनांमध्ये उपस्थित असताना मुस्लिम धर्माची व मुस्लिम धर्मगुरु / प्रेषित यांची
प्रतिमा मलिन होईल असे जाणीवपूर्वक वक्तव्य केले आहे. याबाबतचा तक्रारी अर्ज बारामती
शहर पोलीस स्टेशनला दि. १६/८/२०२४ रोजी व बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे दि.
२०/८/२०२४ रोजी दाखल केलेला आहे. तरी देखील आज तगायत दोन्ही पोलीस स्टेशनचे
पोलीस निरीक्षक यांनी संबंधीत मुस्लीम समाजाचे प्रेषीत हजरत मुहम्मद स्व. यांचे विरोधात
बेताल व अक्षेपहार्य वक्तव्य करणाऱ्या इसमा विरुध्द तक्रार दाखल करून घेतली नाही.
यामुळे बारामतीतील मुस्लीम समाजाच्या भावना आणखी दुखावल्या गेल्या आहेत. म्हणून
आम्ही समस्त बारामती मुस्लिम समाज शहर व ग्रामीण दिनांक २३/८/२०२४ रोजी दुपारी
२.०० वाजल्यापासून उपविभागीय अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत गेट समोर
लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करणार अहोत. संबंधीत इसमाचे विरोधात जोपर्यंत तक्रार
दाखल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे याची कृपया दखल घ्यावी.असे लेखी निवेदन समस्त मुस्लिम समाज बारामती शहर व ग्रामीण भागातील समाज बांधवांनी दिले.यावेळी शेकडो मुस्लिम बांधव प्रशासकीय भवन इमारतीच्या गेटसमोर बसून होते.यावेळी पोलीसाचा मोठा बंदोबस्त होता.

No comments:

Post a Comment