बापरे..धक्कादायक प्रकार आला समोर दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणात बारामतीतील अकरा जणांवर गुन्हा दाखल..
बारामती:- बारामतीतील दोन अल्पवयीन मुलींवर पाच जणांनी अत्याचार केल्याची बातमी प्रसिद्ध झाली पण नुकताच धक्कादायक खुलासा समोर आला बारामतीतील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनेत बारामतीतीलच आणखी सात जणांनी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला, या दोन्ही मुलींनी तपासामध्ये अजून सात जणांची नावे घेतलेली असून आता या प्रकरणात या सातही जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आता एकूण अकरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी नवीन पुरवणीमध्ये ओंकार भारती,
ओम कांबळे, अप्पा शेंडे, अक्षय मडके, सूरज
इंदलकर, संस्कार वाघमारे व श्रेणिक भंडारी
(संपूर्ण नावे नाहीत) या सात जणांवर बाल
लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून
या सातही जणांचा पोलिस शोध घेत आहेत.दोन अल्पवयीन मुलींना पळवून त्यांच्यावर पुण्यात अत्याचार केल्या प्रकरणी बारामती शहर
पोलिसांनी या अगोदर ज्ञानेश्वर उर्फ ज्ञानेश भारत
आटोळे. अनिकेत प्रमोद बेंगारे, यश उर्फ सोन्या
शिवाजी आटोळे या चौघांवर गुन्हा दाखल केला
होता.पोलिसांनी संबंधित मुलीकडे सखोल तपास
केल्यानंतर या प्रकरणात आणखी काही जणांनी
या मुलींवर या अगोदरच्या काळात अत्याचार
केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या
मुलींच्या जबाबानुसार वरील सात जणांवर
पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
No comments:
Post a Comment