बारामती येथील रहात्या घरी अवैधरित्या मास विक्री करणाऱ्यां दोघांवर बारामती शहर पोलीस व विश्व हिंदू परिषद बजरंग दल बारामती याची धडक कारवाई.. गुन्हा दाखल. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, September 21, 2024

बारामती येथील रहात्या घरी अवैधरित्या मास विक्री करणाऱ्यां दोघांवर बारामती शहर पोलीस व विश्व हिंदू परिषद बजरंग दल बारामती याची धडक कारवाई.. गुन्हा दाखल.

बारामती येथील रहात्या घरी अवैधरित्या मास विक्री करणाऱ्यां दोघांवर बारामती शहर पोलीस व विश्व हिंदू परिषद बजरंग दल बारामती याची धडक कारवाई.. गुन्हा दाखल.
बारामती:- बारामती शहर पोलीस स्टेशनच्या वतीने अवैद्य गोमांस विक्री प्रकरणी बारामती येथील फातिमानगर जुना मोरगाव रोड कसबा तालुका बारामती जिल्हा पुणे येथील असणारा आरोपी तनवीर हमीद कुरेशी (वय 36 वर्षे )राहणार सिकंदर नगर कसबा बारामती याच्या असणाऱ्या कत्तलखान्यामधून 1700 रुपये किमतीचे 11.764 किलो वजनाची गोमांस,पाचशे रुपये किमतीचे लॉर्ड बालाजी स्केल कंपनीचा इलेक्ट्रॉनिक काटा,100 रुपये किमतीचा लोखंडी सतुर,100रुपये किमतीचा लाकडी कुंदातसेच 2400 रुपये रोख रक्कम त्याच्याकडे केलेल्या कारवाईमध्ये पोलिसांनी जप्त करून आरोपीस आपल्या ताब्यात घेतले आहे.

सदरचा गुन्हा दिनांक 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास घडला असून याबाबतची फिर्याद बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र महादेव शिंदे यांनी दिली असून त्या इसमावर 706/2024 BNS 325 सह महा.पशु.संरक्षण अधिनियम कलम 5(B) 9,9(A) नुसार, एन्ट्री नंबर 33/2024 नुसार पालिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर हकीकत अशी आहे की,दिनांक 20 सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता च्या सुमारास आरोपी तनवीर हमीद कुरेशी हा फासेना फातिमानगर जुना मोरगाव रोड येथील कत्तलखान्यामध्ये गोमंस जातीचे जनावरांची कत्तल करून ती विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी लागलीच त्या कत्तलखान्यावरती दहा टाकून पुढील कारवाई केलेली आहे या कारवाईदरम्यान फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र महादेव शिंदे यांनी फिर्याद दिली होती सदरील गुन्हा नोंद कामी ठाणे अंमलदार सहाय्यक फौजदार मोरे यांनी कामकाज पाहिले तसेच पुढील गुन्हयाचा तपास हे हवा.जगताप करत आहेत तसेच या कारवाई दरम्यान  बारामती बजरंग दलाचे प्रमुख अक्षय देवकाते सौरभ पवार आकाश शेरे यांनी सदर कामी मोलाचे सहकार्य केले.

No comments:

Post a Comment