पांल्यासाठी वेळ देणे काळाची गरज: विशाखा दलाल* गायन व व्याख्यानाच्या माध्यमातून महिलांना प्रबोधन - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, September 20, 2024

पांल्यासाठी वेळ देणे काळाची गरज: विशाखा दलाल* गायन व व्याख्यानाच्या माध्यमातून महिलांना प्रबोधन

*पांल्यासाठी वेळ देणे काळाची गरज:  विशाखा दलाल* 
गायन व व्याख्याना च्या माध्यमातून महिलांना प्रबोधन 
बारामती: (प्रतिनिधी)योग्य वयात योग्य संस्कार होण्यासाठी  पालकांनी  काळजी घ्या व संपत्ती कमवत असताना अमूल्य संपत्ती वर वेळ देणे व त्यांच्याबरोबर संवाद साधणे  ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय वक्त्या सौ. विशाखा दलाल यांनी केले.
बुधवार दि.१८ सप्टेंबर रोजी
बारामती मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ सेवा संघ व इस्कॉन बारामती वैष्णवी समिती आयोजित  'नातेसंबंध जोपासण्यासाठी सुसंवाद' या विषयावर सौ. विशाखा दलाल यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन  केले.
या प्रसंगी  जिजाऊ सेवा संघाचे अध्यक्षा स्वाती ढवाण,उपाध्यक्षा मनीषा शिंदे व भारती शेळके,कल्पना माने,सुनंदा जगताप ,वीणा यादव, विद्या नींबाळकर,सारिका मोरे, वंदना जाधव,सुवर्णा केसकर, ऋतुजा नलवडे, पूजा खलाटे ,संगीता साळुंखे ,गौरी सावळेपाटील  व इस्कॉन च्या डॉ अपर्णा काटे ,डॉ दीपाली शिंदे, संजीवनी गिरीमकर व आंतरराष्ट्रीय गायिका अनुराधा शानबाग आदी मान्यवर उपस्थित होते.
 बालवयात संस्कार केल्यास जीवनभर उपयोगी पडणार व सुसंस्कृत आदर्श समाज घडेल व 
मुलांनी मोठे झाल्यावर ज्येष्ठ आई वडील,सासू सासरे यांच्या बरोबर सुसंवाद साधून प्रेम द्यावे व आदर्श  निर्माण करावा संस्कृती व देश  टिकवण्यासाठी संस्कार ची गरज असून भौतिक सुखा पेक्षा एकमेकांशी सुसंवाद साधावा असेही . विशाखा दलाल यांनी सांगितले.
या प्रसंगी सुमधुर भक्ती गीते, श्रवणीय कीर्तन, सुंदर नाटिका  इस्कॉन च्या वतीने सादर करण्यात आले.उपस्थितीचे स्वागत अध्यक्षा स्वाती ढवाण यांनी केले तर आभार  उपाध्यक्षा मनीषा शिंदे यांनी मानले.


No comments:

Post a Comment