सुपा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी रात्रीच्या वेळी मंदिरामध्ये चोरी करणारे ३ आरोपी व १ विधी संघर्ष बालक यांचे कडुन १०७ वर्षाची चोरी गेलेली मुर्ती तसेच इतर मंदिरातील देविचे मुखुट व मंदिरातील वस्तु आरोपींकडुन हस्तगत... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, September 19, 2024

सुपा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी रात्रीच्या वेळी मंदिरामध्ये चोरी करणारे ३ आरोपी व १ विधी संघर्ष बालक यांचे कडुन १०७ वर्षाची चोरी गेलेली मुर्ती तसेच इतर मंदिरातील देविचे मुखुट व मंदिरातील वस्तु आरोपींकडुन हस्तगत...

सुपा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी रात्रीच्या वेळी मंदिरामध्ये चोरी करणारे ३ आरोपी व १ विधी संघर्ष बालक यांचे कडुन १०७ वर्षाची चोरी गेलेली मुर्ती तसेच इतर मंदिरातील देविचे मुखुट व मंदिरातील वस्तु आरोपीं
कडुन हस्तगत...
सुपे:- पुणे ग्रामीण जिल्हातील तसेच शेजारील सातारा जिल्ह्यातील मंदिरात चोरीच्या घटना
घडलेल्या होत्या. सदरच्या चो-या या मंदिरात होत असल्याने लोंकाच्या भावनेचा व श्रध्देचा विषय असल्याने सदरचे आरोपी हे अटक करणे हे एक मोठे आव्हान झाले होते.सदरचे घडणारे गुन्हया बाबत मा. पोलीस अधिक्षक श्री पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक श्री गणेश बिरादार, मा. उप विभागिय पोलीस अधिकारी श्री सुदर्शन राठोड यांनी मंदिर चोरी करणा-या आरोपी शोध घेणे बाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने
दिनांक १६/०९/२०२४ रोजी रात्रगस्त अधिकारी स.पो.नि. नवसरे यांनी रात्रगस्त साठी असनारे अंमलदार यांना रात्रगस्त करुन मंदिरातील चो-या होवु नये या करीता पोलीस स्टेशनचे रात्रगत अमंलदार पो. कॉ. १६३४ सचिन दरेकर व पो. कॉ.१८६ सागर अशोक वाघमोडे यांना सुचना दिल्या होत्या रात्रगस्त दरम्यान मौजे दंडवाडी गावचे हददीत रात्रगस्त करीत असताना एक मारूती सुझुकी कंपनीची अल्टो ८०० कार नं एम. एच. १२ सी. डी.६७५७ ही रोडचे कडेला नंबरप्लेटवर चिखल लावुन संशईत रित्या थांबलेली दिसली रात्रगस्त अंमलदार हे सदर गाडीजवळ जाताच गडीतील इसमाने सदरची गाडी वेगात सुपे बाजुकडे घेवुन गेला. त्याच वेळी शेजारीच असलेल्या विठठ्ल मंदिरातील दोन अनोळखी इसम हे त्या ठिकाणहुन अंधारात पळुन गेले त्यावेळी रात्रगस्त अंमलदार यांनी सदर  घटनेची माहिती रात्रगस्त साठी असलेले सहा.पोलीस निरीक्षक श्री.मनोजकुमार नवसरे
यांना दिली ते तात्काळ स्टाफसह सदर ठिकाणी आले. कार घेवुन पळालेल्या इसमाचा
पाटलाग करुन त्यास लोणंद जि. सातारा येथुन ताब्यात घेतले ताब्यात व अंधाराचा फायदा
घेवुन पळालेल्या इसमांना देखील शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची
नावे अनुक्रमे १) ओंमकार शशिकंत सांळुखे रा. आनंदपुर ता. वाई जि. सातारा सध्या रा.
शिरवळ पंढरपुर फाटा ता. खंडाळा जि.सातारा २) तुषार अनिल पवार रा. दत्तनगर सांगवी
रोड ता.खंडाळा जि.सातारा ३) सौरभ दत्तात्रय पाटणे रा. शिरवळ ता. खंडाळा जि.सातारा व
एक विधीसघर्ष बालक यांचेकडुन १५ लहानमोठ्या घंटा,१ पानेश्वर देवाची मुर्ती, २ मुकुट,२ समई,१ पंचार्थी, असा माल हस्तगत करण्यात आला असुन त्यातुन खालील
गुन्हयाची उखल झाली आहे.
१) सुपा पोलीस गु.र.न.
:-१) २४३/२०२४, २)२४४/२०२४,
२) भोर पोलीस स्टेशन गु.र.नं:- १) ६५ / २०२४,
३) वेल्हा पोलीस स्टेशन :-१) ७१ /२०२४
४) सातारा ग्रामीण पोलीस स्टेशन :- १) ३८५ / २०२४
५) वाटार पोलीस स्टेशन :- १) १७८ / २०२४,२) १८५/२०२४
६) हडपसर पोलीस स्टेशन :- १) १६१९ / २०२३
सदर आरोपीं यांनी वाई, राजगड, लोणंद, सातारा, जेजुरी व इतर ठिकाणी सदर प्रकारचे
गुन्हे केल्या बाबत सांगत असल्याने तेथील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री. पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक
श्री. गणेश बिरादार, मा. उप विभागिय पोलीस अधिकारी श्री  सुदर्शन राठोड यांचें 
मार्गदर्शनाखाली,स.पो.नि.ममनोजकुमार नवसरे, स.पो.नि. कुलदिप कोळी,सहा. फौजदार कारंडे, पो. हवा. रुपेश साळुंके, राहुल संकपाळ, पो. स. ई. जिनेश भाग्यवंत, संदिप लोंढे, विशाल
गजरे, अनिल दनाणे अभिजीत एकशिंगे, स्वप्नील अहिवळे, विनोद पवार, पो. कॉ. सचिन दरेकर,सागर वाघमोडे,संतोष जाविर, तुषार जैनक, महादेव साळुंके, किसन ताडगे, रुषीकेश विर, भाऊसाहेब चौधरी होम शिवतारे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment