जल्लोषाने दणाणली बारामती;पवार विरुद्ध पवार लढतीत भरघोस मताने अजितदादाच विजयी. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, November 23, 2024

जल्लोषाने दणाणली बारामती;पवार विरुद्ध पवार लढतीत भरघोस मताने अजितदादाच विजयी.

जल्लोषाने दणाणली बारामती;पवार विरुद्ध पवार लढतीत भरघोस मताने अजितदादाच विजयी.
बारामती:-पुन्हा एखादा बारामती जल्लोषाने फुलली नुकताच  बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांनी १ लाख १६ हजारांच्या मताधिक्यासह  विजय मिळवला
आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर होत असलेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढाई झाली होती. अजित पवार यांना त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी घेत आव्हान दिलं होतं. स्वत: शरद पवार यांची ताकदही युगेंद्र पवारांच्या
पाठीशी असल्याने बारामतीत यंदा अटीतटीची लढत होईल,असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र अजित पवार यांना पुन्हा एकदा या मतदारसंघावर आपलं वर्चस्व सिद्ध करत मोठा विजय मिळवला आहे.बारामती मतदारसंघातून अजित पवार यांना एकूण १ लाख ९६ हजार ६४० मते मिळाली, तर युगेंद्र पवार यांना अवघ्या
८० हजार ४५८ मतांवर समाधान मानावं लागलं. बारामती विधानसभेसाठी यंदा ३ लाख ८० हजार ६०८ मतदारांपैकी २ लाख ७२ हजार ४०८ मतदारांनी मतदान केले. यामध्ये १ लाख २९ हजार ४०१ स्त्रिया, तर १ लाख ५२ हजार ९९६

पुरुष मतदार, तसेच इतर ११ मतदारांचा समावेश होते. यंदा एकूण ७१.५७ टक्के मतदान झाले होते. २०१९ मध्ये ६८.२८ टक्के मतदान झाले होते. त्यानुसार तुलनेने यंदा मतदानामध्ये ३.२९ टक्के वाढ झाली होती. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीतही अजित पवार यांना १
लाख ९५ हजार ६४१ मते मिळाली होती. तर तत्कालीन भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना ३० हजार ३७६ मते मिळाली होती. पवार यांना त्यावेळी १ लाख ६५ हजारांपेक्षा अधिक मतांचे विक्रमी मताधिक्य मिळाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात फूट पडल्यानंतर बारामतीत पवार विरुद्ध पवार असे निवडणुकीचे समीकरण सुरू झाले होते.यंदा मोठया मताधिक्याने निवडून आल्यानंतर बारामतीत राष्ट्रवादी व भाजप च्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला, तर शुभेच्छाच्या बॅनर ने बारामती गजबजलेली दिसत आहे.

No comments:

Post a Comment