जप्त केलेली मालमत्ता मुक्त;उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, December 6, 2024

जप्त केलेली मालमत्ता मुक्त;उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा...

जप्त केलेली मालमत्ता मुक्त;उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा...
दिल्ली:- नुकताच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली ते उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अजित पवार यांची
आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता दिल्लीतील कोर्टाच्या आदेशानंतर मुक्त करण्यात आली आहे. दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाने याबाबतचा निर्णय दिला आहे.कोर्टाच्या या निर्णयाने अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांचे पुत्र पार्थ
पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी सबंधित जप्त मालमत्ताही कोर्टाने मोकळी केली आहे. अजित पवारांच्या स्पार्कलिंग सॉईल, गुरु कमोडिटी, फायर पॉवर अॅग्री फार्म आणि निबोध ट्रेडिंग कंपनीशी सबंधित मालमत्ता जप्त
करण्यात आल्या होत्या. पण अखेर कोर्टाच्या आदेशानंतर या मालमत्ता मुक्त करण्यात आल्या आहेत.विशेष म्हणजे अजित पवार यांनी 5 डिसेंबरला सहाव्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर
दुसऱ्याच दिवशी अजित पवारांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. आयकर विभागाने काही महिन्यांपूर्वी अजित पवार, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या काही मालमत्तांवर आयकर विभागाने कारवाई केली होती. आयकर विभागाने संबंधित मालमत्ता
जप्त करण्याची कारवाई केली होती. या कारवाई विरोधात पवार कुटुंबियांनी कोर्टात धाव घेतली होती. संबंधित कारवाई ही 2023 मध्ये झाली होती. त्याविरोधात संबंधित कारवाई स्थगित करण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या याचिका वारंवार करण्यात आल्या होत्या. यानंतर
स्थगितीची ऑर्डर काढण्यात आली होती. पण जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्यात आली नव्हती. त्यानंतर आता ट्रिब्यूनल कर्टाने जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्याच आदेश दिले आहेत. त्यामुळे अजित पवारांना हा मोठा
दिलासा मिळाला आहे.

No comments:

Post a Comment