एम.पी.आय.डी. प्रकरणी आरोपी ढमढेरेयांना ७ वर्षे सश्रम कारावासाची व प्रत्येकी १६,००,०००/- रुपये दंडाची शिक्षा... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, January 18, 2025

एम.पी.आय.डी. प्रकरणी आरोपी ढमढेरेयांना ७ वर्षे सश्रम कारावासाची व प्रत्येकी १६,००,०००/- रुपये दंडाची शिक्षा...

एम.पी.आय.डी. प्रकरणी आरोपी ढमढेरे
यांना ७ वर्षे सश्रम कारावासाची व प्रत्येकी १६,००,०००/- रुपये दंडाची शिक्षा...

बारामती:- बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. देशपांडे साो. यांनी सुनावली
शिवाजी तुकाराम ढमढेरे व मंदाराणी शिवाजी ढमढेरे रा. राहूपिंपळगांव, ता.दौंड जि. पुणे यांना बारामती येथील विशेष जिल्हा न्यायाधीश – २ मा. आर. के.देशपांडे यांनी दिनांक १६/०१/२०२५ रोजी एम.पी.आय.डी. कायदयांतर्गत कलम ३ अन्वये ६ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी १,००,०००/ रुपये दंड व दंड न भरल्यास १८ महिने सश्रम कारावास तसेच भा.द.वि. कलम ४२०, ३४ अन्वये,
आरोपीस ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी पंधरा लाख रूपये दंड व दंड न
भरल्यास १८ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.या प्रकरणाची हकीकत
सदरच्या केसमध्ये आरोपी शिवाजी तुकाराम ढमढेरे व मंदाराणी शिवाजी ढमढेरे यांनी सन २०१७ मध्ये सक्सेस ग्रुप स्थापन करुन त्या अंतर्गत श्री महालक्ष्मी नारायण बचत गट व शिवजीत मुद्रा मल्टिस्टेट क्रेडिट कॉपरेटीव्ह सोसायटीची स्थापना करुन बारामती शहरातील सर्वसाधारण गृहिणींना वेगवेगळी प्रलोभने व आश्वासने देवून महिलांची बचत गटांद्वारे त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांचेकडून दरमहा बचतीच्या स्वरुपात रक्कम स्विकारली व त्याबदल्यात त्यांना एका वर्षानंतर दामदुपट्टीने रक्कम परत करण्याचे आश्वासन देवून कोणत्याही प्रकारचा परतावा न देता सर्वसाधारण
महिलांची फसवणुक केली असल्याने बारामती शहर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी भक्ती प्रकाश क्षिरसागर यांनी सन २०१९ रोजी महिलांची फसवणूक झालेबाबतचा गुन्हा नोंदविला.
त्या अनुषंगाने स.पो.नि. विकास बडवे यांनी सखोल तपास करुन सहा आरोपीं विरुध्द एम.पी.आय.डी. कलम ३,४ व भा.द.वि. कलम ४२०, ४०९ व इतर प्रमाणे मे. कोर्टामध्ये दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणांमध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ज्ञानदेव साहेबराव शिंगाडे व फिर्यादीचे वकील अॅड. परीश बाबूराव रुपनवर यांनी सरकार पक्षातर्फे १३ साक्षीदार तपासले. तसेच आरोपी पक्षाने बचावार्थी १ साक्षीदार तपासला. त्यामध्ये
फिर्यादी व इतर महिला तसेच बॅक ऑफ महाराष्ट्र व आय.डी.बी.आय बँकेंचे अधिकारी यांनी न्यायालयात साक्ष दिली. तसेच तपासादरम्यान मिळालेला कागदोपत्री पुरावा व गुन्हयात वापरलेला जप्त मुद्देमाल या सर्व पुराव्यांची न्यायीक पडताळणी करता मा. जिल्हा न्यायाधीश - २ आर. के. देशपांडे साो यांनी मुख्य आरोपी शिवाजी तुकाराम ढमढेरे व मंदाराणी शिवाजी ढमढेरे यांना दोषी धरुन शिक्षा सुनावली आहे.
तसेच इतर आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.विशेष सरकारी वकील ज्ञानदेव साहेबराव शिंगाडे यांनी सदर खटल्याचे पूर्ण
कामकाज पाहिले. सरकारी वकीलांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून न्यायालयाने आरोपी शिवाजी तुकाराम ढमढेरे व मंदाराणी शिवाजी ढमढेरे यांस वरील प्रमाणे शिक्षा सुनावली आहे. सदर खटल्यामध्ये सरकारी वकील ज्ञानदेव शिंगाडे व फिर्यादी वकील ॲड परीश बाबुराव रुपनवर यांना कोर्ट अंमलदार म.पो. कॉ. उमा एन. कोकरे, पो. हवा.डी. एस. राउत यांनी तसेच कोर्ट पैरवी श्रेणी पो.स. ई. नामदेव नलवडे यांनी सहकार्य केले. तसेच सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन तपासी अधिकारी स.पो.नि. विकास
बडवे यांनी केला होता.

No comments:

Post a Comment