खळबळजनक..नात्यातील एका मुलीसोबत कॅफेमध्ये बसला म्हणून एकावर कोयत्याने वार..!
बारामती :-कोयता व गुन्हेगारी एक समीकरण झालं आहे, अनेक घटनांमध्ये सर्रास कोयता वापरल्याचे दिसून आलं आहे, नुकताच एका घटनेत नात्यातील एका मुलीसोबत कॅफेमध्ये
बसल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन
येथील एका युवकावर दुस-या युवकाने कोयत्याने वार केल्याची घटना बारामतीत घडली.
या संदर्भात सिध्दार्थ सुनील चौधर (वय 19, रा.
वंजारवाडी, ता. बारामती) याने फिर्याद दिली असून त्याच्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी नागेश ज्ञानदेव गोफणे(रा. वंजारवाडी, ता. बारामती) याच्याविरुध्द गुन्हा दाखल
केला आहे.शुक्रवारी (ता. 17) संध्याकाळी नात्यातील एका मुलीसोबत नागेश गोफणे एका कॅफेमध्ये बसला होता, ही घटना पाहिल्यानंतर त्याचा जाब सिध्दार्थ याने नागेशला पाहिल्यानंतर त्याचा जाब सिध्दार्थ याने नागेशला विचारल्याचा राग मनात धरुन नागेश याने सिध्दार्थ याच्यावर कोयत्याने मानेवर, पाठीत व मांडीवर वार केले.
डोक्यात कोयता मारत असताना तो वार हातावर घेतल्याने हाताला दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी तालुका पोलिसांनी नागेश गोफणे विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
No comments:
Post a Comment