बारामतीत अजितदादांकडून 'यादगार फर्निचर' दुकानाचं उद्घाटन..
यांनी बारामतीमधील फलटण रोड नजीक
यादगार फर्निचर उद्घाटन करून कार्यक्रमात अजितदादा पवार बोलताना म्हणाले की लगेच कुणालाही श्रीमंत होता येत नाही त्याला कष्ट घ्यावे लागतात, संसाराच्या लागणाऱ्या सर्व वस्तू या यादगार फर्निचरमध्ये मिळतात.लगेच श्रीमंत होता येत नाही त्याला कष्ट घ्यावे लागतात. चिकाटी ठेवावी लागते.पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यात या पगार फर्निचर हे नाव नावाजले आहे. अर्ध्या एकराचे हे फर्निचरचे दुकान आहे. बारामती आणि पंचक्रोशी ते नागरिकांना याचा फायदा होईल. पुण्याला किंवा दुसरीकडे जाण्याची गरज भासणार नाही.आजकाल नोकरी करता माझ्याकडे आई-वडील पालक मुली वनवन फिरत असतात,मात्र यादगार फर्निचरच्या या धंद्यावर 60-65 लोकांची रोजी रोटी चालत
आहे. आज कालच्या तरुणांनी तरुणींनी यातून प्रेरणा घेतली पाहिजे. अलीकडील काळात फर्निचरला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे. मला माझ्या आईला भेटायचं आहे, आणखीन पुढे कामे आहेत.लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात आल्या आहेत त्यांना नमस्कार करतो.तसेच बोलताना हाजी इमरान हनिफ शेख,इरफान हनिफ शेख,रिजवान हनिफ शेख या बंधूंना सांगितले की अजिबात उधारीचा धंदा करू नका, रोखीचा धंदा करा. धंदा जरा कमी झाला तरी चालेल बोर्ड लावून ठेवा आज रोख उद्या उधार असं म्हणा.असं म्हणून त्यांनी आपल्या भाषणाची सांगता केली.यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर, पत्रकार, महिला व समाज बांधव उपस्थित होते.
No comments:
Post a Comment