बारामतीत पोलीस असल्याची बतावणी
करून वयोवृद्धाला चक्क तीन लाख 42
हजारांचा गंडा..
बारामती :- पोलीस असल्याची बतावणी करून दोन अनोळखी तरुणांनी भर दिवसा वयोवृद्धाची फसवणूक करून त्या वयोवृद्धाला चक्क तीन लाख 42 हजारांचा गंडा घातल्याची घटना बारामती शहरात घडली आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी आहे की,भिगवण रोड नजीक सहयोग सोसायटी समोरील सर्व्हिस रोडने
वयोवृद्ध फिर्यादी दिलीप जगदाळे हे त्यांच्या मोटार सायकलवरून घरी जात असताना मागून दोन इसम मोटरसायकल वरून येऊन, ओळखल का ? गाडी थांबवा.. आम्ही पोलिस आहोत सकाळीच सहयोग समोर एका मुलावर चाकूने वार झाला आहे एवढे सोने घालुन का फिरताय
आम्ही त्याच्या तपासासाठी पुण्यावरून आलो आहोत असे सांगुन घातलेले सोने चोर चोरून नेतील असे सांगुन तुमच्याकडील सोन्याच्या वस्तू रुमालात बांधून ठेवा असे सांगून दोन सोन्याच्या अंगठ्या व एक सोन्याची चैन रुमालात न बांधता हातचलाखी करून स्वतःजवळ ठेवून फिर्यादीची फसवणूक करून साधारण तीन लाख 42 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे ,
याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment