लोकशाही दिनात प्राप्त अर्जावर वेळेत कार्यवाही करावी- उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, March 17, 2025

लोकशाही दिनात प्राप्त अर्जावर वेळेत कार्यवाही करावी- उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर

लोकशाही दिनात प्राप्त अर्जावर वेळेत कार्यवाही करावी- उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर
बारामती दि. 17:  नागरिकांचे प्रश्न तालुकास्तरावर मार्गी लावण्याच्या अनुषंगाने लोणी भापकर येथे आयोजित लोकशाही दिनात नागरिकांकडून एकूण 15 अर्ज स्विकारण्यात आले आहेत, या अर्जावर संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करुन ते वेळेत निकाली काढावेत, असे निर्देश उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिले.   

यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी अनिल बागल, माळेगाव न.प. मुख्याधिकारी बालाजी लोंढे,  भुमी अभिलेख उपअधीक्षक संजय धोंगडे,  वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार असून  यामध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. शिंदे  यांनी  केले आहे.

No comments:

Post a Comment