बारामतीत फिरायला जाणाऱ्या व्यक्तीचा नगरपरिषदेसमोरच अपघातात मृत्यू..
बारामती:-रंगपंचमी च्या दिवशी सकाळी बारामती शहरातील मध्यवर्ती चौकांनजिक बारामती नगर परिषदेच्या समोर अपघात झाला या अपघातात वयोवृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला याबाबत सतिष कांतीलाल दोशी वय 71 वर्षे रा- मातृपित्रु छाया बिल्डीग पहिला मजला कचेरी रोड बारामती यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली या फिर्यादी नुसार मिळालेली माहिती अशी की, दिनांक 19/03/2025 रोजी सकाळी सव्वा सहा ते साडेसहा च्या दरम्यान मोतीलाल उत्तमचंद दोशी वय 82 वर्षे रा. सुभाष चौक बाटा शोरूम शेजारी बारामती हे नेहमीप्रमाणे घरातून पायी चालत वॉकिग करता गेले असता बारामती नगरपरिषद समोरुन चालत जात असताना पाठीमागुन येणा-या टाटा कंपनीची बस क्र MH-01-L-7309 या गाडीवरील चालक सुनिल पांडुरंग शेंडगे वय 39 वर्षे रा. सध्या रा खंडोबानगर बारामती ता बारामती जि पुणे मुळ रा. भिगवण ता बारामती जि पुणे असे त्याचे नाव समजले त्याचे ताब्यातील सदरची बस भरधाव वेगात वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करून बेदारकपणे हयगयीने चालवित घेवुन जावुन माझे काका मोतीलाल उत्तमचंद दोशी यांना बसची धडक देवुन त्याचा अपघात करुन अपघातात बसचे चाक त्यांचे यांचे डोक्यावरुन जावुन त्यांचे गंभीर दुखापतीस व त्यांचे मृत्युस कारणीभुत झाला व अपघाताची खबर न देता व जखमीस उपचारा करीता घेवुन न जाता तो त्याचे ताब्यातील बससह भिंगवण रोडकडे पळून गेला म्हणुन चालक सुनिल पांडुरंग शेंडगे वय 39 वर्षे रा. सध्या रा खंडोबानगर बारामती ता बारामती जि पुणे मुळ रा. भिगवण ता. बारामती, जि .पुणे याचे विरुध्द कायदेशीर फिर्याद दाखल झाली बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 93/2025 BNS 281,106(1) मो. वा. का. क 184,134,177,112/183(1) प्रमाणे गुन्हा नोंद झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहे.
No comments:
Post a Comment