लाच घेताना बारामती नगर परिषदेचा नगररचना अधिकारी एक लाख घेताना सापडला..!
बारामती:- बारामती नगरपरिषदेचे नगररचनाकार विकास किशोर ढेकळे यांना लाच मागणी प्रकरणात एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. बुधवारी (दि. १९) रात्री आठच्या सुमारास शहरातील एका जिममधून ढेकळे यांना एसीबीने ताब्यात घेत अटक केली.जीममध्ये एसीबीने केलेल्या या कारवाईची मोठी
चर्चा शहरात झाली. या प्रकरणी नगरपालिकेचा टाऊन प्लॅनिंगचा अधिकारी फक्त सहीच्या फॉरमॅलिटीसाठी पैसे मागायचा अशी माहिती पुढे येत असून याबाबत मिळालेल्या माहितीनुसार
बारामतीतील एका बांधकाम व्यवसायिकाला सहीसाठी एक लाख रुपयांची लाच मागणारा हा
अधिकारी आज लाच घेताना सापडला. विशेष म्हणजे लाच घेतानाचा सापळा हा बारामतीतील एका जिम मध्ये लावण्यात आला होता, व्यायामाच्या निमित्ताने जाणारा हा अधिकारी एक लाख रुपयांची लाच घेताना यामध्ये सापडला. गेल्या अनेक महिन्यांपासून या अधिकाऱ्याच्या
लाचखोरीची चर्चा बारामतीत होती.अनेक वेळा नगरपरिषदे मध्ये उशिरापर्यंत कामकाज चालू असायचे बांधकाम व्यावसायिक उशिरापर्यंत याठिकाणी पाहायला मिळत होते,मात्र अनेकदा बांधकाम व्यवसायिक आपले काम व्हावे यासाठी देखील आग्रही असायचे,बारामतीतील बांधकाम
व्यवसायिकाला त्याचे प्रकरण पूर्ण व सुयोग्य असतानाही केवळ सही करण्यासाठी लाच मागितली. अखेर तडजोडीमध्ये एक लाख रुपयांची लाच ठरली. मात्र वैतागलेल्या बांधकाम
व्यवसायिकाने लाचलचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. तेथे पडताळणीत ही लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आज हा सापळा लावण्यात आला.या नगरचनाकाराने पावणेदोन लाखांची मागणी केली होती. त्यातील एक लाख
रुपये स्वीकारताना आज त्याला जिम मध्ये ताब्यात घेण्यात आले. याबाबत तपास सुरू असल्याचे कळतंय.
No comments:
Post a Comment