बारामती नगर परिषदेचे नगर रचनाकार यांच्यावर झालेल्या कारवाईच्या समर्थनात क्रेडाई बारामती चे निवेदन..
बारामती:- दिनांक १९ मार्च 2025 रोजी बारामती नगर परिषदेचे नगर रचनाकार विकास ढेकळे (वर्ग एक) यांना एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. क्रेडाई बारामतीचे सदस्य श्री भगवान चौधर यांनी याप्रकरणी एसीबी कडे तक्रार दाखल केली होती. एका बांधकाम परवानगी देण्यासंबंधी पैशाची मागणी केली होती. बारामती नगर परिषदेस मिळणाऱ्या महसुलापैकी मोठा वाटा हा बांधकाम परवानगीच्या माध्यमातून जमा होत असतो .बारामती शहराच्या विकासामध्ये बारामतीतील बांधकाम व्यावसायिकांचा मोलाचा वाटा आहे. या
संदर्भात क्रेडाई बारामती म्हणून आम्ही सदर निवेदनात नमूद करतो की बारामती नगर परिषदेतील नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा
प्रचंड त्रास बारामती मधील सर्व बांधकाम व्यवसायिकांना मागील काही वर्षापासून
होत असून मा. मुख्याधिकारी सुद्धा याकडे कानाडोळा करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.तरी या निवेदनाद्वारे आम्ही क्रेडाई बारामती तर्फे वरील विकास ढेकळे यांच्यावरील कारवाईचे समर्थन करत असून क्रेडाई बारामती च्या वतीने प्रशासनास विनंती आहे की वरील प्रकारची गंभीर दखल घेऊन भविष्यात कार्यतत्परता व कार्यक्षमता वाढवावी असे पत्र प्रसिद्धी साठी राहुल खटमोडे अध्यक्ष व अमोल कावळे सचिव यांनी दिले.
No comments:
Post a Comment