फुले-आंबेडकर जयंती: विधायक उपक्रमांनी दिला समानतेचा संदेश..
बारामती: क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मानव एकता युवक संघटना आणि महात्मा फुले नगर भिमजयंती महोत्सव समितीच्या वतीने विधायक उपक्रम राबवत उत्साहात साजरी करण्यात आली.समाजामध्ये समता,बंधुता आणि ऐक्याचा संदेश देण्यासोबतच प्रत्येकाच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मंगळवार दि.१५ एप्रिल ते शुक्रवार दि.१८ एप्रिल दरम्यान परिसरातील शालेय विद्यार्थी आणि महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
शालेय विद्यार्थ्यंसाठी चित्रकला,निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.जॅमध्ये विध्यार्थ्यानी या महामानवांच्या विचारांना सादर करत आपली कला आणि विचारशक्ती दाखवली.तसेच महिलांसाठी घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेतुन महिलांनी आपल्या कौशल्याची झलक दाखवली.या स्पर्धांमधील विजेत्यांचा आणि सहभागी स्पर्धकांचा माजी उपनगराध्यक्ष भारत अहिवळे,पालिकेचे आरोग्य अधिकारी राजेंद्र सोनवणे,माजी नगरसेवक प्रा.रमेश मोरे यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि शालेयपयोगी साहित्य देऊन सन्मान करण्यात आला.
या उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान दर्जा देऊन त्यांच्या मध्ये असलेल्या कलागुणांना वाव देऊन त्यांना व्यक्त होण्यासाठी विचारमंच उपलब्ध करून देण्यासोबतच फुले-शाहु-आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार आजच्या नव्या पिढीमध्ये रुजवण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.सेजल अहिवळे,वासंती अहिवळे,प्रतिज्ञा चव्हाण,प्रा.शिल्पा घोडके,रसिका अहिवळे,सौरवी अहिवळे,भावना अहिवळे,राजश्री अहिवळे,प्रेरणा अहिवळे,प्रगती अहिवळे,सारिका गव्हाळे,पुजा लोंढे,ॲड.सुशिल अहिवळे,शुभम अहिवळे,रणधीर चव्हाण,विजय मागाडे,विशाल घोडके,नितीन गव्हाळे,आदेश लोंढे,राजन जगताप आदींनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment