सुपरिचित व्यक्तिमत्त्व सुनील आण्णा शिवाजीराव पाटोळे यांचे दुःखद निधन..
वाघळवाडी:- अण्णाभाऊ साठे सामाजिक विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि सोमेश्वर शिक्षण संस्थेचे पाटोळे मामा म्हणून शिपाई असणारे कर्मचारी नीरा वाघळवाडी पंचक्रोशीतील सर्वांना सुपरिचित असणारी आवडते व्यक्तिमत्व सुनील आण्णा शिवाजीराव पाटोळे यांचे 23 एप्रिल 2025 रोजी वयाच्या 54 व्या वर्षी पहाटे साडेपाच वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले असल्याचा फोन मला निरा येथील मा मुख्याध्यापक दिलीप साबळे अण्णा यांनी मला फोन केला त्यावेळी मी गिरजनी अकलूज येथे माझ्या गावी होतो सकाळी सात वाजता फोन आला होता मला क्षणभर सुचले नाही कारण मागील आठवड्यात मी अण्णांना फोन केला होता लुंबिनीला पुरस्कार सोहळा आहे 12 मे 2025 रोजी त्यांनी मला सांगितलं बघू सर पुरस्कार सोहळ्याला येण्याचा प्रयत्न करू पण अण्णा आता कुठेच माझ्याबरोबर येऊ शकणार नाहीत त्याचं माझ्या मनात अत्यंत दुःख आणि वेदना आहे अतिशय निगर्वी समाजसेवेची आवड असणारे प्रसंगी स्वतः अडचण निर्माण करून दुसऱ्यांना आनंद निर्माण करून देणारे थोर महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी नीरा शिव तक्रार तालुका पुरंदर जिल्हा पुणे या गावांमध्ये साजरा करणारे स्वतःच्या स्वखर्चाने महापुरुषांची जयंती सोहळे साजरे करून समाजसेवा कर्त्यांचा सन्मान करणारे लोकांना एकत्रित करून समाजप्रबोधन आणि शिव शाहू फुले आंबेडकर विचाराची कास धरणारे सुनील आण्णा पाटोळे आपल्यात राहिले नाहीत हे लिहीत असताना माझं मन अत्यंत दुःखाने भरून येत आहे वास्तविक पाहता सुनील आण्णा पाटोळे आणि आमची चार-पाच वर्षाची पुरस्काराच्या सोहळ्याच्या निमित्ताने दिल्ली येथे भेट झाली त्यांच्याकडे माझं नेहमी येणे जाणे असायचं मी निऱ्याला त्यांच्या घरी गेलो की फोन केला की ताबडतोब अण्णा गाडी घेऊन एसटी स्टँडवर आलेले असायचे आणि म्हणायचे की साठे सर तुमच्यासारखा माणूस आपल्या समाजामध्ये एवढे मोठे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळे घेत नाही असा भारतामध्ये माणूस सापडणार नाही तुमच्यासारखा सतत माझ्या कार्यक्रमांमध्ये सावलीसारखे उभे राहणारे सुनील आण्णा पाटोळे होते त्यांना भारतीय कर्मचारी मजदूर युनियन यांचा पुरंदर तालुक्याचे पद भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष पद मी राष्ट्रीय अध्यक्षाकडून त्यांना सुपूर्द केलं होतं कारण त्यांच्याकडे काम करण्याची आणि समाजातील चांगली माणसे पारखण्याची ताकद होती माझी भेट झाली की नेहमी म्हणायचे सर तुम्ही फार पळापळी करता फार काम करता फार समाजसेवा करता तुमचा कधीतरी आम्ही सत्कार केला पाहिजे मागील वर्षी त्यांनी अण्णाभाऊ साठे सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या वतीने मला निरा येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला बोलावून मला अण्णाभाऊ साठे समाज रत्न पुरस्कार दिला हा पुरस्कार मला त्यांनी भारतरत्न पुरस्कार पेक्षा त्यांनी दिलेला पुरस्कार मोठा वाटतो आज अण्णा हयात नाहीत त्यांना जाऊन आज तीन दिवस झाले प्रत्यक्ष दर्शन घेण्याची खूप इच्छा होती मागील महिन्यापासून पण जमलं नाही त्यामुळे अण्णा आपल्यात राहिले नाहीत त्याचं अत्यंत दुःख आणि वेदना माझ्या मनाला होत आहेत सोज्वळ शालींता सर्व शिक्षकांना बोलण्याची त्यांची प्रेमळ व मवाळ भाषा शिपाई जरी शाळेत असले तरी सर्व शिक्षकांचं मुख्याध्यापकांचे काम कधी पाच मिनिटात पूर्ण करून देणारे काम अशी अतिशय प्रामाणिकपणे सेवा त्यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखाना अंतर्गत असणाऱ्या सोमेश्वर विद्यालयांमध्ये तन मन वेचून सेवा केली सर्व कर्मचाऱ्यांचे सर्व शिक्षकांचे त्यांनी आपल्या हयातीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम पार पाडून त्यांच्या मनामध्ये ते घर करून राहिले माझ्याही मनामध्ये ते घर करून राहिले प्रसंगाचा दिल्लीमध्ये मागील दोन-तीन वर्षांपूर्वी मी आम्ही अण्णा गेलो होतो एका पुरस्कार सोहळ्यामध्ये येथील थोडेसे आयोजक माझ्यावर चिडलेले असताना त्यांनी स्वतः त्या आयोजकावर रागावून संतापून त्यांना म्हणाले की साठे सरासारखा विद्वान माणूस अख्या दिल्लीमध्ये नाही यांनी म्हणाले की साठे सरा सारखा इतका मोठा विद्वान माणूस असताना तुम्ही त्यांना स्टेज वरती अपमानित करत असाल तर आम्ही हे कार्यक्रम सोडून निघून जातो म्हणजे माझी प्रत्येक बाजू समर्थपणे सांभाळणारे अण्णा होते आज अण्णा आपल्यामध्ये राहिले नाहीत तरीदेखील मी पाटोळे परिवारावर झालेल्या दुःखाच्या डोंगररामध्ये भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय संघटक मी स्वतः नात्याने भारतीय कर्मचारी मजदूर युनियन सेंटर कमिटीचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व संस्थांचे प्रतिनिधी यांच्या माध्यमातून मी अण्णांच्या कुटुंबावर जे दुःख कोसळलेला आहे त्या दुःखामध्ये सहभागी आहे अण्णा तुम्ही जरी या पृथ्वीतलावर दिसला नाही तरी तुमची कामाची आणि तुम्ही दिलेल्या संस्कार आम्हाला दिलेली शिकवण याची सातत्याने आम्ही आठवण ठेवून तुमचे कार्य फुले शाहू आंबेडकर चळवळीचे कार्य आम्ही पुढे असेच समर्थपणे अविरतपणे चालू ठेवू तुमच्या जाण्याने माझं व्यक्तिगत अतिशय नुकसान झालेल आहे माझं मन अत्यंत दुःखी व विषण्य झालेल आहे पाटोळे परिवारावर या प्रसंगी कोसळलेल्या दुःखाच्या या लाटेमध्ये मी स्वतः आहे तुम्हा सर्व परिवाराच्या दुःखामध्ये माझं साठे परिवार माझा भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ माझी कर्मचारी मजदुर युनियन सेंट्रल कमिटी दिल्ली मुंबई सर्व पदाधिकारी सहभागी आहेत इथून पुढे आकाश आमच्या पाटोळे ताई यांना मी कधीही अंतर देणार नाही कायम त्यांच्या पाठीमागे अगदी पहाडासारखा उभा राहील एवढेच अण्णा तुम्हाला या निमित्ताने विश्वास देतो अण्णांच्या या हा भावपूर्ण श्रद्धांजली च्या निमित्ताने मी त्यांच्या स्मृतीला त्रिवार अभिवादन करतो एका कवीने म्हटलेला आहे की अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवून जाती दोन दिवसाची रंगतसंगत दोन दिशांची नाती अशी दोन दिसाची रंगत संगत करून गेलेले अण्णा पुन्हा आपल्या मध्ये दिसणार नाहीत परंतु अण्णांच्या कार्याचा सुगंध सामाजिक कार्याचा सुगंध सगळीकडे दरवळत राहणार यात तीळ मात्र शंका नाही अण्णा तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी लेख लिहिला होता माझे आपण सुहास्य वदनाने अभिनंदन केले होते उत्तम लिहिलाय लेख सर ते मला म्हणायचे तुम्ही स्वतः अण्णाभाऊ साठे यांच्या वंशज असल्यामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या वंशज लेखकाला काय कमी आहे प्रतिभा शक्ती आणि खरोखरच अण्णांचे शब्द खर ठरतात अण्णा तुम्ही आज आमच्या मध्ये नाही परंतु तुमची आठवण कायम आयुष्यभर माझ्या मनात घर करून राहणार आहे तुमच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून ही शब्दांची पुष्पांजली आपल्या चरणावर समर्पित करतो आपल्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो प्राध्यापक गोरख जगन्नाथ साठे भारतीय कर्मचारी मजदूर युनियन सेंट्रल कमिटी राष्ट्रीय सरचिटणीस राष्ट्रीय संघटक भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ भारत रजिस्टर गव्हर्मेंट ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ग्लोबल ह्यूमन राईट प्रोटेक्शन फोरम बारामती जिल्हा पुणे महाराष्ट्र
No comments:
Post a Comment