बारामती तालुक्यातील ग्रामसेवकाला पकडले लाच घेताना रंगेहाथ..
बारामती :- नुकताच काही महिन्यांपूर्वी बारामती नगर परिषदेच्या नगररचना अधिकाऱ्याला एक लाखाची लाच घेताना पकडले होते याची चर्चा कुठे संपत नाही तोच बारामती तालुक्यातील एका गावातील ग्रामसेवकाने लाच घेतल्याचे पुढे आले याबाबत मिळालेली माहिती अशी की,ठेकेदाराचे बिल काढण्याच्या बदल्यात चार टक्के प्रमाणे ३० हजार रुपयांची मागणी करत २५ हजार रुपये लाच स्वीकारणाऱ्या पळशी (ता.बारामती) येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात पकडण्यात आले.कांता बापूराव काळाणे (वय ५७) असे कारवाई झालेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे.याप्रकरणी काळाणे यांच्या विरोधात वडगाव निंबाळकर
पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. एका शासकीय ठेकेदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
तक्रारदार हे परवानाधारक ठेकेदार असून त्यांनी पळशी ग्रामपंचायत हद्दीत एका पाणी साठवण सिमेंट बंधाऱ्याचे काम केले होते. या कामाचे बिल १६ लाख ४६ हजार रुपये असून हे बिल मंजूर होण्याकरता काळाणे यांनी ठेकेदाराकडे बिलाच्या चार टक्के प्रमाणे ६० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. या कामाच्या बिलाचा १४ लाख ९६ हजाराचा पहिला धनादेश देताना काळाने यांनी
६०:हजार रुपयापैकी ३० हजार रुपये रोख स्वरूपात घेतले होते. उर्वरित १ लाख ५० हजाराचे बिल काढण्यासाठी काळाने यांनी तक्रारदार यांच्याकडे ३० हजार रुपयांची
मागणी केली होती. तडजोडी अंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यानंतर तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची शहानिशा एसीबीकडून करण्यात आली. त्यानंतर पंचा समक्ष सापळा कारवाईचे
नियोजन करण्यात आले.त्या अनुषंगाने बुधवारी (दि. ७) एसीबीकडून सापळा रचण्यात आला. पळशी गावचे हद्दीत एका रस्त्या नजीक
तक्रारदार यांच्याकडून २५ हजार रुपये स्वीकारताना काळाने यांना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई एसीबी चे पोलीस निरीक्षक अमोल भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
No comments:
Post a Comment