शहानुर शेख यांच्यावर हिंदू धर्माबद्दल पोस्ट करून भावना दुखावल्याबद्द्ल गुन्हा दाखल..
बारामती:- ता. 07/05/2025 रोजी श्री सुरेंद्र शामसुदंर जेवरे बारामती ता.बारामती जि. पुणे यांनी समक्ष बारामती शहर पोलीस स्टेशन मध्ये हजर राहुन फिर्यादी जबाब दिला की, मी वरील ठीकाणी माझे कुटुंबासह राहणेस असुन मी खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो.माझा मोबाईल नंबर यावर माझे व्हाटसअप अकाऊंट असुन त्यावर बाळासाहेब तात्या युवा मंच व भाजपा बारामती तालुका हे दोन व्हाटसअप ग्रुप असुन त्यामध्ये मी सदस्य आहे. त्याच दोन्ही ग्रुपमध्ये शाहनुर शेख मोबाईल हा पण सदस्य आहे. बाळासाहेब तात्या युवा मंच या व्हाटसअप ग्रुपचा अँडमिन मोहन सांगळे ,सचिनकुमार आटोळे हे असुन भाजपा बारामती तालुका या व्हाटसअप ग्रुपचा अँडमिन प्रमोद तावरे व प्रविण आटोळे हे आहेत. सदर दोन्ही व्हाटसअप ग्रुप मध्ये प्रतिष्ठित कॉमन सदस्य आहेत.दिनांक 03/05/2025 रोजी सांयकाळी 06/40 वा मी माझे मोबाईल फोन मधील व्हाटसअप पाहत असताना बाळासाहेब तात्या युवा मंच व भाजप बारामती तालुका या दोन व्हाटसअप ग्रुप वर ग्रुप मधील सदस्य शाहनूर शेख मोबाईल नंबरवर याने एक छापील कागद शेअर करुन त्याखाली हिंदु बद्दल बदनामी होईल असे टाईप केलेले होते. म्हणुन मी त्याने शेअर केलेला छापील कागद झुम करुन वाचला असता त्यात हिंदु धर्माबद्दल बरेच काही मजकूर लिहिला होता या मजकुराचा कागद व्हाटसअप ग्रुप वर प्रसारीत करुन त्या कागदावर खाली केंद्रीय गृहमंत्रालय चे नोटीफिकेशन नंबर तारीख सह प्रसारीत करुन हिंदु धर्माची बदनामी करण्याच्या उदेशाने दोन धर्मामध्ये सामाजिक
तेढ निर्माण होण्याचे उदेशाने सदरची पोस्ट वॉटसप ग्रुपवर प्रसारीत करुन माझा व हिंदु धर्माच्या भावना दुखावले आहेत म्हणुन माझी शाहनुर शेख पुर्ण नाव माहीत नाही रा कसबा बारामती यांचेविरुध्द माझी फियौद आहे.प्रसारीत केलेल्या पोस्टची स्क्रीन शॉटची प्रत या सोबत हजर करीत आहेत.तरी ता 03/5/2025 रोजी सायंकाळी 6/40 मौजे बारामती येथे मी घरी असताना बाळासाहेब तात्या युवामंच व भाजप बारामती तालुका या दोन्हा वॉटसप ग्रुपवर शाहनुर शेख पुर्ण नाव माहीत नाही रा कसबा बारामती याने हिंदु धर्माची बदनामी करण्याच्या उदेशाने दोन धर्मामध्ये सामाजिक व जातीय तेढ निर्माण होण्याचे उदेशाने सदरची पोस्ट वॉटसप ग्रुपवर प्रसारीत करुन माझा व हिंदु धर्माच्या लोकांच्या भावना दुखावले आहेत म्हणुन शाहनुर शेख पुर्ण नाव माहीत नाही रा कसबा यांचेविरुध्द फिर्याद दाखल केली असून अंमलदार. पो हवा वीर यांनी दाखल करून घेतली.
No comments:
Post a Comment