बारामती मेडीकल कॉलेज मध्ये देहदानाची परंपरा कायम.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 6, 2025

बारामती मेडीकल कॉलेज मध्ये देहदानाची परंपरा कायम..

बारामती मेडीकल कॉलेज मध्ये देहदानाची परंपरा कायम..
बारामतीः येथील वीरशैव लिंगायत समाज ट्रस्टचे माजी विश्वस्त रामकृष्ण लिंबराज सुरवडे (वय- ८७ वर्ष) यांचे त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या शरीरांचे देहदान बारामती मधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे त्यांचे दोन मुले तसेच नातवांडे यांच्या एकविचाराने केल्याने समाजाच्या सर्व स्तरातून विशपतः वीरशैव लिंगायत समाजातून सुरवडे परिवाराचे विशेष कौतुक
होत आहे.शनिवारी (दि.३) रोजी दुपारी ३ वा. दरम्यान रामकृष्ण निवास, ओमकारेश्वर सोसायटी, जळोची, बारामती येथील
निवास स्थानावरुन वैद्यकीय महाविद्यालय येथे शासकीय रुग्णवाहीकेतून मृतदेह आणण्यात आला.पुर्तता यावेळी महाविद्यालयातील शरीररचनाशास्त्र विभागाने सर्व कागदपत्रांची
मृतदेह तपासून ताब्यात घेतला. यावेळी
महाविद्यालयाच्या प्र. अधिष्ठाता डॉ. भालेराव मॅडम, शरीररचनाशास्त्र विभागाच्या प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ.अंजली पाटील, सहयोगी प्राध्यापिका डॉ. गितांजली सुडके, तंत्रज्ञ
श्री सोमनाथ भारती यांनी देहदानाचा स्विकार केला. यावेळी विभागप्रमुख डॉ.अंजली पाटील यांनी देहदानाचे महत्व, त्याचे समाजाप्रती असणारे फायदे, वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या
संशोधन कार्यात त्याचे अमूल्य असे असणारे महत्व इ. गोष्टींचे बारकाईने विश्लेषण करुन देहदान केल्याबदद्ल संबंधित नातेवाईकांचे आभार व्यक्त केले.देहदान झाल्यानंतर त्याचे विशेष जतन करण्याच्या प्रक्रियेसाठी शरीररचनाशास्त्र विभागातील पाठयनिर्देशक डॉ.
अतुल अग्रवाल, डॉ. वृंदा चौहान, डॉ. गणेश यांनी तसेच रितेश दामोदरे, प्रियांशू भोसले, नवनाथ शिंदे, सागर लोंढे, अमोल काटे, क्षितीज सरोदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment