केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंचा कानमंत्र;हात धुवून मागे लागा, अजितदादाच तक्रार घेऊन आले पाहिजेत..
मुंबई:-मुंबईत नुकताच गृहमंत्री अमित शाह आले होते,आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. या निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याचे संकेत आहेत. मात्र, त्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपच्या आमदारांना दिलेल्या कानमंत्राची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अजितदादा माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत असे शाहंनी भाजप आमदारांना सांगितल्याचे समोर येत आहे.अजित पवारांकडून मुद्दाम पराभूत उमेदवारांना ताकद देण्याचे काम चालू आहे,अमित शाह काल (दि.27) मुंबईत आले होते. यावेळी भाजप आमदारांनी दादांबद्दल त्यांच्याकडे नाराजीचा सूर
व्यक्त केला. 2024 साली विधानसभेत भाजपा आमदारासमोर पराभूत उमेदवाराना ताकद देण्याचे काम मुद्दाम अजित पवार करत आहे. आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत अजितदादा मुद्दाम भाजपची ताकद कमी करू पाहत आहे. तसेच भाजप विरोधकांना ताकद देत आहे असा तक्रारींचा पाढा वाचत भाजप आमदारांनी गाऱ्हाणे मांडलं. त्यावर शाह यांनी
आपल्या आमदारांची संख्या अधिक, अशात मागे
हटू नका ,प्रशासन आणि सरकार पातळीवर आक्रमकपणे कामांचा पाठपुरावा करा, असं सांगत दादांच्या कुरघोड्या करण्याऐवजी कामांसाठी असे हात धुवून मागे लागा की अजितदादाच स्वतःच माझ्याकडे तक्रार घेऊन आले पहिजे.आपल्या आमदारांची संख्या अधिक
पुढे भाजप आमदारांना मार्गदर्शन करताना शाह यांनी आपल्या आमदारांची संख्या अधिक, अशात मागे हटू नका,प्रशासन आणि सरकार पातळीवर आक्रमकपणे कामांचा पाठपुरावा करा, असेही सांगितले आहे.पालिका निवडणुकांमध्ये भाजप स्वबळावर लढणार असे शाहांचे संकेत..
मुंबई, ठाणे आणि पुणे या महत्वाच्या शहरांच्या आणि उत्पन्नाच्या दृष्टीनं महत्वाच्या असलेल्या महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याबाबतचे संकेत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे प्रमुख नेते अमित शहा यांनी मुंबई
दौऱ्यावेळी दिल्याचे सांगितले जात आहे. आढावा बैठकीत शाह यांनी मुबई. ठाणे आणि पुण्यात स्वबळावर लढण्याबाबत चाचपणी करा, अशा सूचना महायुतीतील नेत्यांना दिल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
No comments:
Post a Comment