वैद्यकिय सेवेबद्दल मंगेश खताळ व कृष्णमुर्ती जगताप आरोग्यदुत म्हणुन सन्मानित.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, June 1, 2025

वैद्यकिय सेवेबद्दल मंगेश खताळ व कृष्णमुर्ती जगताप आरोग्यदुत म्हणुन सन्मानित..

वैद्यकिय सेवेबद्दल मंगेश खताळ व कृष्णमुर्ती जगताप आरोग्यदुत म्हणुन सन्मानित.. 
बारामती: -शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष, खा.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या वतीने वैद्यकिय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डाॅक्टर, वैद्यकिय संस्था,रुग्णसेवक यांचा सन्मान सोहळा लोटस् हाॅल कोल्हापुर येथे नुकताच पार पडला.यावेळी विनामोबदला,कोणतेही मानधन न घेता भरीव असे कार्य करणारे मंगेश खताळ व कृष्णमुर्ती जगताप यांचा उद्योग मंत्री उदय सामंत,आ.राजेश क्षिरसागर,मा.आ.शहाजी बापु पाटील,आ.सुहास बाबर माजी आ.सुजित मिनचेकर,शिवसेना प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे,श्री.मंगेश चिवटे, श्री.रामहरी राऊत, श्री.प्रशांत साळुंखे व इतर मान्यवरांच्या हस्ते आरोग्यदुत /रुग्णसेवक सन्मानपत्र देवुन सन्मान करण्यात आला.मंगेश खताळ व कृष्णमुर्ती जगताप यांनी विनामोबदला दिलेल्या रुगसेवेबद्दल त्यांचा हा सन्मान वैद्यकिय क्षेत्रासाठी एक आदर्श ठरला आहे.आम्हाला मिळालेला सन्मान हा आमचा नसुन बारामती तालुक्यात रुग्णकार्य करणाऱ्या सर्व रुग्णसेवकांचा आहे तसेच आमचे रुग्ण कार्य हिच आमची ओळख आहे असे कृष्णमुर्ती जगताप शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष बारामती शहर कक्षप्रमुख यांनी यावेळी सांगितले.हा सन्मान स्विकारण्यासाठी हनुमंत देवकाते,सुशिल कुमार अडागळे,प्रविण (सोनु) माकर,शशिकला काळे, कमल लोंढे,कल्पना जाधव उपस्थित होते.या कार्यक्रमा साठी पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, रुग्णसेवक यांच्यासह कोल्हापुर, सांगली, सातारा,पुणे, सोलापुर, रत्नागिरी,सिंधुदुर्ग येथील नामांकित डाॅक्टर,व शिव सैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment